वाघाच्या हल्ल्यात मोहफुल गोळा करणाऱ्या ईसमाचा मृत्यू
(तळोधी बा. वनपरिक्षेत्रातील गंगासागर हेटी येथील घटना)

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे
तळोधी बा.- ब्रम्हपुरी वन विभाग अंतर्गत येणाऱ्या तळोधी बाळापुर वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गंगासागर हेटी येथील मारोती सखाराम बोरकर (वय ६०) हे आज सकाळी 8 वाजे मोहफुल गोळा करण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेले असता. कक्ष क्रमांक ९० या परिसरातील वावरनार्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.
संबंधित घटनेची माहिती मिळतात तळोदी बाळापुर वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार व त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली व मोक्याच्या पंचनामा करून शव विच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे पाठविण्यात आले. मृत्तकाचे परिवाराला तात्काळ आर्थिक मदत करण्यात आली. परिसरातील लोकांना वन उपज संकलन करण्याकरिता जंगलात एकदम सकाळी व आतपर्यंत एकट्याने न जाण्याचे व सावधानता बाळगण्याचे सुचना तळोधी बा.चे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार यांनी दिल्या.
घटनास्थळी वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याकरता कॅमेरे लावण्यात आले आहेत.
‘(तळोदी वनविभागाचे गस्ती पथक सातत्याने परिसरात गस्त घालीत आहेत व वारंवार सावधानतेचा इशारा देत आहेत मात्र याकडे दुर्लक्ष करून वन उपज गोळा करताना वाघाचे वास्तव्य असलेल्या ठिकाणापर्यंत एकट्याने न जाता लोकांनी दक्षता बाळगायला हवी जेणेकरून कुणाचीही जिवीत हानी होणार नाही.’ – यश कायरकर, अध्यक्ष, ‘स्वाब फाऊंडेशन’)