जागतिक एड्स सप्ताह निमित्त एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- विदर्भ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागा अंतर्गत जागतिक एड्स दिन सप्ताहाच्या निमित्ताने महाविद्यालयात रेड रिबन क्लब जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या सहकार्याने एड्स जनजागृती समस्या व निराकरण या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. वासाडे उपस्थित होते तर रेड रिबन क्लबच्या आसमा पठाण, स्वाती वाढई, पूनम चुनारकर, स्वाती खोब्रागडे या उपस्थित होत्या. त्यांनी परिसरात व समाजात एड्स बद्दल जी जनभावना आहे त्यासंबंधी विस्तार पूर्वक विवेचन करण्यात आले. तसेच एड्स हा रोग कशा पद्धतीने पसरतो व त्यावर कसा आळा घालता येईल किंवा जर झाला असेल तर त्यावर कोण कोणती औषधे व कुठे उपलब्ध आहेत याबाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक डोरलीकर तर आभार प्रा.सचिन यंगंदलवार यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्राचार्या डॉ. शाक्य मॅडम,यांच्या मार्गदर्शनात, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षक केतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.