भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती विविध सामाजिक व्यापारी संघटनांनी केली साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
विशाल मानकर व शैलेश मानकर यांनी संपूर्ण जनतेला दिला भोजन दानाचा आनंद.
महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तथा शिक्षण राज्यमंत्री ना. डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून केले अभिवादन.
14 एप्रिल 2025 रोजी विविध सामाजिक व्यापारी संघटनांनी वर्धा व विशाल मानकर आणि शैलेश मानकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने वर्धा जिल्ह्यातील सर्व जनतेला दिला भोजनदानाचा आनंद यावेळी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तथा शिक्षण राज्यमंत्री ना. डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले.
यावेळी वर्धा जिल्ह्याचे माजी खासदार रामदास तडस यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे वर्धा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मुकेश्वर डॉ नितीन भोला ॲड विकास साठे भंते राजरत्न राहुल करंडे नगरसेवक प्रदिप जग्यासी विजय जाॅनी सुहास थुल रितेश गांधी सविता तडस ज्योती कोमलकर पंचशिला बोरकर वर्षाताई थुल वैशाली पाटील संदीप विधानी महेश भोयर गुप्ताजी विशाल मरडवार हिंमत खोब्रागडे रामुभाऊ लष्कर शैलेश मानकर अखिलेश मानकर विशाल मानकर यांच्या हस्ते झाले वर्धा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना भोजन दानाचा आनंद देण्यात आलेला आहे यावेळी सर्व बुद्ध बांधवांनी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायी भोजन दानाचा लाभ घेतला आहे.