राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रवेश कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार व पार्टी चे प्रदेश अध्यक्ष खा. आदरणीय सुनीलजी तटकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष नितीन भाऊ भटारकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश भैय्या सोमाणी यांच्या मार्गदर्शनात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बल्लारपूर शहर अध्यक्ष विक्रांत भाऊ पंडित यांच्या नेतृत्वात व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश सरचिटणीस माजी नगरसेवक कुतुब भाई सिटी यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रवादी काँग्रेस कामगार विभाग जिल्हाध्यक्ष संजय भाऊ सेजुल, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमर भाऊ गोमासे, राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभाग शहर अध्यक्ष आसिफ भाई शेख, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष प्रणित भाऊ सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत बल्लारपूर येथील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आज प्रवेश घेतला.
यावेळी सर्वांचे गळ्यात दुपट्टा व बुके देऊन स्वागत करण्यात आले. आज झालेल्या प्रवेशामुळे निश्चितच पक्षाला बळकटी मिळेल असा विश्वास आहे.