“एक तास राष्ट्रवादीसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी” उपक्रम उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतील “एक तास राष्ट्रवादीसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी” हा उपक्रम माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या आदेशाने देऊळगाव राजा तालुक्यातील मौजे असोला जहागीर येथे राबविण्यात आला.यावेळी तालुक्यातील पदाधिकारी व गावातील नागरिकांनी एकत्रित येऊन विविध विषयांवर चर्चा केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारला” एक तास राष्ट्रवादीसाठी,महाराष्ट्राच्या विकासासाठी”हा उपक्रम घेण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार आज देऊळगाव राजा तालुक्यातील मौजे असोला जहागीर येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व गावकऱ्यांनी एकत्रित येऊन सदर उपक्रम राबविला.
यावेळी तालुक्यातील पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्रित एक दिलाने काम करावे. येणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकामध्ये माजी मंत्री डॉ.शिंगणे यांच्या नेतृत्वात पक्षाला विक्रमी मताधिक्य मिळवून देण्यासंदर्भात निश्चय करण्यात आला. महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफी संदर्भात केलेल्या फसवणुकीचा निषेध सदर उपक्रमात करण्यात आला. शेतकऱ्यांबरोबर फसवणूक झालेल्या लाडक्या बहिणी, बेरोजगार तरुण, ज्येष्ठ नागरिक यांची फसवणूक करणाऱ्या महायुती सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे, पंचायत समितीचे माजी सभापती हरीष शेटे, बाजार समितीचे माजी सभापती गजानन पवार, राष्ट्रवादीचे नेते गणेश सवडे, गणेश बुरकुल, असोला ज. माजी सरपंच अशोक शेळके, माजी नगरसेवक विष्णू रामाने, कारभारी शेळके यांच्यासह गावकरी उपस्थित होते.