ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देवांग वस्त्रालयाने जोपासली सामाजिक बांधिलकी 

रथसप्तमीच्या दिवशी चार हजार महिलांनी घेतला हळदी कुंकवाचा लाभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 शहरात व पंचक्रोशीत कपड्याचे माहेरघर म्हणून देवांग वस्त्रालयाचे नाव आवर्जून घेतल्या जाते या ठिकाणीं किफायतशीर व खात्रीशीर सर्वच प्रकारचे कापड मिळत असल्याने अल्पावधीत या दालनाने आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केलेली आहे मकर संक्रांतीच्या निमित्ताने रथसप्तमीच्या दिवशी समाजाचे आपणास काहीतरी देणे लागते या हेतूने सामाजिक बांधिलकी जोपासत देवांग वस्त्रालयाचे दालनात हळदीकुंकवाचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

भगवंतांचे पूजनानंतर जवळपास चार हजार महिलांनी या ठिकाणी येऊन हळदी कुंकवाचा लाभ घेतला यावेळी भावना प्रवीण रोडे, रेणुका तेजस रोडे, अनुसया रामभाऊ रोडे, उर्मिला गणेश रोडे, वैशाली शशिकांत रोडे, यांनी आलेल्या महिलांचे स्वागत करून प्रत्येकाला भेट वस्तू दिली यांनी जोपासलेल्या सामाजिक बांधिलकीची शहरभर चर्चा सुरू होती

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये