ताज्या घडामोडी

बल्लारपूर तालुक्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव बब्बू भाई इसा यांची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मांगणी

चांदा ब्लास्ट :

चंद्रपूर तालुक्याला लागून असलेल्या बल्लारपूर , विसापूर येथे फार जुने 1955 ते 1960 पासून विद्युत केंद्र होते, परंतु चंद्रपूर येथील महाऔष्णिक केंद्र सुरू झाल्या नंतर ते बंद करण्यात आले,
सध्या चंद्रपूर आणि इतर तालुक्यातील बेरोजगारांची परिस्थिती बघता येथे आता रोजगाराची कोणतीही संधी उपलब्ध नाही बल्लारपूर तालुक्यातील सर्वच उद्योग बंद अवसतेत आहे त्या मुळे येथे बेरोजगारी खूप प्रमाणात वाढली आहे
ह्याच विषयाला घेऊन चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव बब्बू भाई इसा ह्यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार साहेब ह्यांची भेट घेतली व ह्या संदर्भात निवेदन दिले आणि सविस्तर चर्चा केली, समनधित विषयावर चर्चा केल्या नंतर सुधीर भाऊ ह्यांनी बल्लारपूर तालुक्यात नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न केल्या जाईल असे आश्वाशन देण्यात आले निवेदन देते वेळी जिल्हा महासचिव बब्बू भाई इसा ह्यांच्या सोबत बल्लारपूर तालुक्यातील असंख्य नागरिक उपस्तीत होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये