ताज्या घडामोडी

गडचांदूर नगरपरिषद कार्यालयात टाकल्या मेलेल्या कोंबड्या व त्याची अवयवे

रफिक निजामी कचरा फेकणारे त्रस्त नागरिक

चांदा ब्लास्ट :

गडचांदूर-

औद्योगिक शहर असलेल्या गडचांदूर नगरपरिषद मध्ये रफिक निजामी या व्यक्तींनी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान हातात पिशव्या घेऊन येऊन मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे कक्षात मेलेल्या कोंबड्या, त्याची अवयवे व कचरा टाकल्या त्यामुळे कर्मचाऱ्यात एकच खळबळ ऊडाली. अगोदरच नगरपरिषद ला मुख्याधिकारी नाही. संपूर्ण कारभार प्रभारी मुख्याधिकारीवर सुरू आहे . सध्या तेही पद रिक्त होते परंतु सदर घटना घडल्याबरोबर तात्काळ सुरज जाधव यांचेकडे प्रभार देण्यात आला. ते नगरपरिषद ला तात्काळ रुजू होऊन सदर प्रकरणाची दखल घेऊन पोलीस स्टेशन गडचांदूर येथे त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
रफिक निजामी यांचे घराजवळ वार्ड क्र.२ येथे चिकन, मटन ची दुकाने आहे. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना दुर्गंधी व फेकलेल्या कचऱ्याचा त्रास होत होता. त्यांनी दुकानदाराने फेकलेली घाण तात्काळ साफ करावी असे नगरपरिषदमधील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना तोंडी सांगत होते. कोणतीही लेखी तक्रार नगरपरिषदला दिलेली नाही अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.
१६. ०३.२०२० ला नगरपरिषदनी गावतील वेगवेगळ्या परिसरात असलेली चिकन, मटण ची दुकाने एकाच ठिकाणी हलविण्यात येईल असा ठराव मंजूर केला. परंतु एवढ्या कालावधी नंतर जागेअभावी व नगरपरिषद मधील आपसी मतभेदांमुळे ते काम तसेच राहिले.
म्हणून आज संतप्त झालेल्या रफिक निजामी यांनी नगरपरिषद कार्यालयातच मेलेल्या कोंबड्या व त्याची अवयव सोबत घेऊन येऊन कार्यालयात टाकले.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
माझ्या घरासमोरील घाणीमुळे मी व परिसरातील नागरिक त्रस्त होतो. तिथे राहणे नागरिकांना कठीण झाले त्यामुळे घाण साफ करावी व तात्काळ निर्णय घ्यावा यासाठी वारंवार तोंडी सांगत होतो. नगरपरिषद मधील कर्मचाऱ्यांना फोन करून दुर्गंधी दूर करावी म्हणून सांगत होतो परंतु कोणीही त्याकडे लक्ष देत नव्हते त्यामुळे मला आज हे कृत्य करावे लागले जेणेकरून नगरपरिषद ला त्याची जाण होईल.

रफिक निजामी
कचरा फेकणारे त्रस्त नागरिक

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये