ताज्या घडामोडी

चंद्रपुरात विदर्भ स्तरीय मानसिक रोग तज्ञाची परिषद चे आयोजन

१७ व १८ जून २०२३ रोजी वन अकॅडमी, चंद्रपूर येथे

चांदा ब्लास्ट :

चंद्रपूर:- मानसिक रोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्यास आळा घालण्यास व बिकट परिस्थितीत सज्ज होण्याच्या दृष्टीने जनमानसाची मनस्थिती उत्तम राखण्याकरिता विचार विनिमयाची गरज लक्षात घेता परिषदेची आवश्यकता वाटली. येत्या १७ व १८ जून २०२३ रोजी वन अकॅडमी, चंद्रपूर येथे विदर्भ स्तरीय मानसिक रोग तज्ञाची परिषद आयोजित केली आहे.
सदर परिषद अध्यक्ष डॉ. इमरान अली शिवजी, सचिव डॉ. सचिन भेदे व प्रबंधक डॉ. किरण देशपांडे यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे.
या परिषदेचे उद्घाटक म्हणून अमरावतीचे अखिल भारतीय मानसिक रोग तज्ञाचे मनोनीत अध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत राठी हे आहेत. इंडियन सायकियेट्री सोसायटीचे डॉ. अरुण मरवाळे व इतर प्रदेशाचे मानसिक रोग तज्ञ मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत.
विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात व वैद्यकीय महाविद्यालयात आत्ता जवळपास ८० मनोविकृती चिकित्सक आहेत जे सेवा देतात ते आवर्जून परिषदेला उपस्थित राहणार आहेत. त्यांना अद्यावत विषयाची माहिती व्हावी जेणेकरून सर्वसामान्य माणसाची रोजचे ताण तणावास तोंड देण्यास सज्ज व्हावे हा या परिषदेचा उद्देश आहे. असे शहरातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ मानसिक रोग तज्ञ डॉ. किरण देशपांडे यांनी कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये