ताज्या घडामोडी

निवडणुक निरीक्षक नरेश झा यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न 

चंदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला आहे, त्याअनुषंगाने आज दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी मा. निवडणुक सामान्य निरीक्षक श्री नरेश झा साहेबांच्या अध्यक्षतेखाली नोडल अधिकारी, झोनल अधिकारी,सहायक झोनल अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक यांची बैठक आज दुपारी 3 वाजता, मतमोजणी कक्ष,वखार महामंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती, असोला रोड, सिंदखेडराजा येथे पार पडले.

उपस्थित सर्व नोडल अधिकाऱ्यांना त्यांना मा. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नेमून दिलेली जबाबदारी योग्य रित्या पार पाडावी तसेच काही समस्या येत असतील तर संबंधित अधिकाऱ्यांना कळवाव्यात.

उपस्थित सर्व झोनल अधिकारी तसेच सहायक झोनल अधिकारी यांनी मतदान साहित्य वाटपापासून ते मतदान साहित्य जमा करेपर्यंत आपले काम जबाबदारीने पार पाडावे अश्या सूचना मा. झा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

तसेच सूक्ष्म निरीक्षक यांनी मतदान केंद्रावर जाऊन सर्व सुविधांचा आढावा घ्यावा तसेच काही गोष्टींची कमतरता असेल तर त्याची पूर्तता करून द्यावी अश्या सूचना मा. झा यांनी दिल्या.

मतदान संकलन केंद्रावर ईव्हीएम तसेच मतदान साहित्य ताब्यात घेणे,सूचीनुसार साहित्य तपासणी करणे, ईव्हीएम तपासणी करणे, टपाली मतपत्रिका घेतली असेल तर स्वतःचे मतदान करून घेणे याबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली.

मतदानापूर्वी कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे याबद्दल प्रा.खडसे यांनी सांगितले कि, मतदान केंद्र उभारणी करणे,अभीरूप (मॉकपोल) मतदान घेणे, कंट्रोल युनिट मधून अभिरुप मतदान नष्ट करणे, VVPAT मधील अभिरूप मतदान चिट्ठया करणे सील करणे याबद्दलची दक्षता घेतली पाहिजे यावर खडसे यांनी भर दिला.

आजच्या या बैठकीला मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे, मा. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित दिवटे,मा. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली डोंगरजाळ, मा. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश माहोर, मा. सामान्य निरीक्षक यांचे सहायक श्री ढगे, मा.नायब तहसीलदार मनोज सातव,मा. नायब तहसीलदार प्रवीण घोटकर, मा. नायब तहसीलदार संतोष मुंढे, मा. नायब तहसीलदार डॉ प्रवीणकुमार वराडे, मा. नायब तहसीलदार प्रांजल पवार, मा. नायब तहसीलदार सायली जाधव, मा. प्र. नायब तहसीलदार नितीन बढे, प्रसार माध्यम नोडल अधिकारी अंकुश म्हस्के उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये