ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विकासकामांना बगल देण्यासाठीच महायुतीचे धर्माचे राजकारण : आ. सचिन पायलट

भद्रावती येथे महाविकास आघाडीची जाहीर सभा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     केंद्रातील भाजप व राज्यातील महायुतीच्या काळात राज्यात विकास कामांना खिळ बसलेली आहे,जनता वाढत्या महागाईने त्रस्त झालेली आहे,बेरोजगारीच्या खाईत राज्यातील युवक लोटल्या जात आहे, देशात व राज्यात विकास कामे शून्य आहे. या समस्या व विकास कामांना बगल देण्यासाठीच महायुती धर्माचे व जातीपातीचे राजकारण करून जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका करीत येत्या निवडणुकीत महायुतीचे सरकार हाणून पाडा व गोरगरिबांच्या कल्याणासाठी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार बसवा असे आवाहन राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री,राजस्थान काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा आमदार सचिन पायलट यांनी केले.

शहरातील स्वागत सेलिब्रेशन सभागृहात दिनांक 13 ला महाविकास आघाडीचे भद्रावती- वरोरा क्षेत्रातील उमेदवार प्रवीण काकडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. त्यात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे,महायुतीचे उमेदवार प्रवीण काकडे, काँग्रेसचे जिल्हा महासचिव धनंजय गुंडावार, राष्ट्रवादीचे मुनाज शेख ,सुधाकर रोहनकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या क्षेत्रातील विकासकामांचा आढावा जनतेपुढे मांडत क्षेत्राच्या विकासासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध असुन क्षेत्राच्या चौफेर विकासासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण काकडे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन नागरिकांना केले.यावेळी ऊमेदवार प्रविण काकडे यांनिही आपले मनोगत व्यक्त करुन प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये