ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीतील कुख्यात गुंड सोनीहालसिंग ऊर्फ सोनु समीरसिंग भादा यास एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारागृहात रवानगी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीतील संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट ता. हिंगणघाट जि. वर्धा परीसरातील कुख्यात गुंड सोनीहालसिंग ऊर्फ सोनु समीरसिंग भादा, वय २४ वर्ष, रा. संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट त हिंगणघाट जि. वर्धा याचे विरुध्द पोलीस स्टेशन हिंगणघाट चे अभिलेखावर शरीराविरुध्द तसेच मालम विरुध्द एकुण १० गुन्हे नोंद आहे. ज्यामध्ये घातक शस्त्रासह बाळगणे, खंडणी मागणे, दुखापत करणे, दा बाळगुण तिची विक्री करणे, घरफोडी करणे, चोरी करणे जुगार चालवीणे अशा प्रकारचे गुन्हे नोंद आहेत. आणि सतत गुन्हे करण्याच्या सवईचा गुन्हेगार होता. त्या पैकी ०४ गुन्हे पोलीस तपासावर असुन ०६ गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत. मागील ४ ते ५ वर्षापासुन स्थानबध्द ईसम नामे सोनीहालसिंग ऊर्फ सोनु समीरसिंगभादा संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट ता. हिंगणघाट जि. वर्धा परीसरात जनसामान्यांच्या मनामध्ये स्वतःची प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्याच्या दहशतीमुळे अनेक पिडीत त्याचे विरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास सुध्दा धजावत नव्हते. त्यामुळे परीसरातील सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होवुन सार्वजनीक जिवन विस्कळीत झाले होते. सोनीहालसिंग ऊर्फ सोनु समीरसिंग भादा राह. संत चोखोबा वार्ड हिंगणघाट ता. हिंगणघाट जि वर्धा याच्या कृत्यांमुळे पोलीस स्टेशन हिंगणघाट अंतर्गत येणाऱ्या परीसरामध्ये सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होत होत असल्याने त्याचेविरुध्द कलम ५६ (१) (अ) (ब) महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये तडीपार कार्यवाही करण्यात आली होती. प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आल्या होत्या. परंतु अशा प्रतीबंधक कार्यवाहीस सुध्दा तो जुमानत नसल्याचे निदर्शनास आले.

त्या अनुषंगाने ठाणेदार मनोज गभणे, पोलीस स्टेशन हिंगणघाट यांनी एम.पी.डी.ए. अन्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने मा. राहुल कर्डीले, जिल्हादंडाधिकारी, वर्धा यांना सादर करण्यात आला होता. सदरहु स्थानबध्द गुंड प्रवृत्तीचा आणि सातत्याने करीत असलेल्या गुन्ह्यांची मा. जिल्हादंडाधिकारी यांनी गांर्भीयाने दखल घेवुन सोनिहालसिंग ऊर्फ समिरसिंग भादा वय २४ वर्षे राह. संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट ता. हिंगणघाट, जिल्हा वर्धा याचे विरुध्द दिनांक २४.१०.२०२४ रोजी स्थानबध्द आदेश जारी करुन त्यास अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.

आगामी विधानसभा निवडणुक लक्षात घेता भयमुक्त व निर्भीड वातावरणात पार पाडण्याचे उद्देशाने वर्धा जिल्हयातील शरीरा विरुध्दचे गुन्हे करणारे गुन्हेगार, अवैध दारुविक्रेते, शस्त्र अधिनीयम अशा गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधक कार्यवाहीचे संकेत उपरोक्त कायद्यान्वये कठोर प्रभावी कार्यवाही करण्याचे पुनःश्च संकेत मा. जिल्हादंडाधिकारी, वर्धा तसेच मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी दिलेले आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चोधरी, स्था.गु.शा. वर्धा, पोलीस निरीक्षक मनोज गभणे, पोलीस स्टेशन हिंगणघाट, सफौ. संजय खल्लारकर, गिरीश कोरडे, पो.हवा. अमोल आत्राम, स्था.गु.शा. वर्धा, तसेच पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पोहवा. प्रवीण देशमुख, पो.हवा. सुनील मळनकर, पो.शि. विजय हारनुर, पो.शि. आशिष मैश्राम यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये