ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांची सुरक्षा या विषयावर प्रा. विजय आकनुरवार यांचे मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनात असताना नेहमी अभ्यासात जिद्द,चिकाटी व आत्मविश्वास ठेवला पाहिजे त्या बरोबरच समाजातील थोरपरुषाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे व आपल्या शालेय जीवनात सुखी व आनंदी जीवन जगण्यासाठी सुसंस्कारीत राहणे व आपली सुरक्षा जपण्याच्या प्रयत्न केला पाहिजे त्या साठी शिक्षक व पालकांनी सुध्दा याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य व रासेयोचे माजी जिल्हा समनवयक प्रा विजय आकनुरवार यांनी व्यक्त केले ते गडचांदूर येथील ब्राईट इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये आयोजित केलेल्या विध्यार्थी पालक मेळावात विद्यार्थ्यांची सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी प्रमुख उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष जगदीश ठावरी,विकास अवघडे, सुनंदा चौधरी, प्रणाली रामटेके,प्राचार्या सौ निर्मला ठावरी,सौ सपना कुसडे, सचिन रहांगडाले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माता पालक समिती, सखी सावित्री समिती व विध्यार्थी सुरक्षा समिति स्थापन करण्यात आली यावेळी या मेळाव्याला मोठ्या संख्येने विध्यार्थी,पालक,व शिक्षक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये