ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मतदार जागृती शिबिर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूर च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मा. सचिन मालवी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिति कोरपणा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

विद्यार्थ्यामध्ये मतदार जागृती वाढवणे राष्ट्र हिताचे आहे व प्रत्येकाने मताधिकारचा वापर चांगले शासन निवडण्यासाठी करावा असे त्यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेन्द्र देव उपस्थित होते. जवळपास 100 विद्यार्थ्यानी मतदार जागृती शिबिरात सहभाग घेतला होता.

कार्यक्रमाचे संचालन श्री. मनोहर बांदरे, नोंदणी अधिकारी यांनी केले व आभार प्रदर्शन श्री चेतन वानखेडे, समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये