ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चारचाकी वाहनासह देशी दारूचा एकून 5 लाख 15 हजारांवर मु‌द्देमाल हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. 23/10/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथकाची दोन पथके पी. स्टे तळेगाव (शा.प.) परीसरात अवैध धंद्‌यावर श्री. रेत कामी पेट्रोलीग करीत असतांना मुखबिरकडून निहालेल्या गोपनीय माहीतीवरून एक सिल्वर रंगाची अल्टो के 10 क्रमांक .MH-27-AC- 8572 था चालक व त्याचा साथीदार त्याचे ताब्यातील कार मध्ये विना पास परवाणा अमरावती नागपुर हायवेने देशी दारूचा साठा घेवुन तळेगाव वरून येणार आहे.

अशा माहीती वरून अमरावती नागपुर हायवे रोडवरील मिष्णुर फाट्‌याजवळ नाकेबंदी करीत असतांना आरोपी हे त्यांचे ताब्यातील अल्टो के 10 गाडीने येतांना दिसले त्यांना थांबवून गाडीची पाहनी केली असता फोर व्हीलर गाडीमधे 1) 12 खर्डाचे खोक्यात 180 एम.एल च्या देशी दारू बॉबी कंम्पनीच्या 576 काचेच्या हिश्या प्रती शिशी 200/- रु प्रमाणे 1,15,200 /- रु था माल 2) एक फोर व्हीलर सिल्वर रंगाची सुझुकी कंम्पनीची अल्टो के 10 बी. क्र.MH-27-AC-8872 ज्याचा चेसीस क्र. MASEADET500219556 की. 4,00,000/- रु. असा जुमला की. 5,15,200 /- रु चा भाल मिळून आल्याने आरोपी 1) मदन जगन्नाथ कैथवास वय 42 वर्ष रा. मायानगर, अमरावती ता. जि. अमरावती 2) कलीम चाउस अली चाउस वय 48 वर्ष रा. एम.आय.डी.सी. अमरावती ता. जि. अमरावती 3) पफुल जयस्वाल रा. अमरावती देशी दारु अ‌ट्टीचा मालक यांचेविरुध्द पोलीस स्टेशन तळेगाव (शा.प.) येथे गुन्हा नौद करून तपासात घेतला.

सदर कारवाई मा. श्री. अनुराग जैन साहेब, पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. सागर कवडे साहेब अप्पर पोलीस अधिक्षक वर्धा, यांचे मार्गदर्शनात श्री. विनेद चौधरी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा, पो. उपनी प्रकाश लसुंते, पोलीस अंमलदार संतोष दरगुडे, अरवीद मैनुरकर, मुषन निधीट, धर्मेंद्र अकाली, पवन पन्नासे, रवी पुरोहीत, हर्षल सोनटक्के, विनोद कापसे, अभीषेक नाईक, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये