जिल्ह्यातील ३८४१ पोस्टर्स, ३२५९ बॅनर्स आणि १२१७ होर्डींग्ज हटविले
जिल्हा प्रशासनाची २४, ४८ आणि ७२ तासात कारवाई

चांदा ब्लास्ट
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यात १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. व मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आदर्श आचारसंहितेचे नोडल अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील पोस्टर्स, बॅनर्स, होर्डींग्ज व इतर बाबी काढून घेण्याची मोहीम जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील एकूण ३८४१ पोस्टर्स, ३२५९ बॅनर्स आणि १२१७ होर्डींग्ज प्रशासनाने हटविले आहेत.
निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच सरकारी मालमत्तेवरून २४ तासाच्या आत, सार्वजनिक ठिकाणांवरून ४८ तासांच्या आत तर खाजगी मालमत्तेवरून ७२ तासांच्या आत सर्व शासकीय कार्यालयातील, परिसरातील तसेच खाजगी जागेतील सर्व राजकीय पक्षाचे, नेत्यांचे, सदस्यांचे फोटो, बॅनर्स, पोस्टर्स, होर्डींग्ज, कटआऊट, झेंडे, भित्तीपत्रके, प्रसिध्दी पत्रके, प्रचार पत्रके काढण्यात येतात. याअंतर्गत जिल्हा प्रशासनाने सरकारी मालमत्तेवरून २४ तासांच्या आत ८५३ भिंतीपत्रके, १९४० पोस्टर्स, ७७७ कटआऊट / होर्डींग्ज, २०१६ बॅनर्स,७३२ झेंडे व ११९ इतर बाबी काढल्या. सार्वजनिक ठिकाणांवरून ४८ तासांच्या आत ८०३ भिंतीपत्रके, १०५३ पोस्टर्स, २५९ कटआऊट / होर्डींग्ज, ७५९ बॅनर्स, ८६२ झेंडे व ६१२ इतर बाबी तसेच खाजगी मालमत्तेवरून ७२ तासांच्या आत ५०७ भिंतीपत्रके, ८४८ पोस्टर्स, १८१ कटआऊट/ होर्डींग्ज, ४८४ बॅनर्स,३०४ झेंडे व ९८३ इतर बाबी काढल्या आहेत. याबाबतचा परिपूर्ण अहवाल जिल्हा प्रशासनाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे.
मतदारसंघनिहाय करण्यात आलेली कारवाई : ७० – राजूरा विधानसभा मतदार संघात २४ तासात भिंतीपत्रके, पोस्टर्स, कटआऊट / होर्डींग्ज, बॅनर्स, झेंडे, इतर अशा एकूण १४०३ बाबी, ४८ तासात १२७८ बाबी आणि ७२ तासात ३०१ बाबी काढण्यात आल्या.
७१ – चंद्रपूर विधानसभा मतदार संघात २४ तासात भिंतीपत्रके, पोस्टर्स, कटआऊट / होर्डींग्ज, बॅनर्स, झेंडे, इतर अशा एकूण ७१६ बाबी, ४८ तासात ८०१ बाबी आणि ७२ तासात १५७४ बाबी काढण्यात आल्या.
७२ – बल्लारपूर विधानसभा मतदार संघात २४ तासात भिंतीपत्रके, पोस्टर्स, कटआऊट / होर्डींग्ज, बॅनर्स, झेंडे, इतर अशा एकूण १४९८ बाबी, ४८ तासात १०९५ बाबी आणि ७२ तासात ६७५ बाबी काढण्यात आल्या.
७३ – ब्रम्हपूरी विधानसभा मतदार संघात २४ तासात भिंतीपत्रके, पोस्टर्स, कटआऊट / होर्डींग्ज, बॅनर्स, झेंडे, इतर अशा एकूण ५४१ बाबी, ४८ तासात ५२२ बाबी आणि ७२ तासात ३७५ बाबी काढण्यात आल्या.
७४ – चिमूर विधानसभा मतदार संघात २४ तासात भिंतीपत्रके, पोस्टर्स, कटआऊट / होर्डींग्ज, बॅनर्स, झेंडे, इतर अशा एकूण १४७५ बाबी, ४८ तासात ३५२ बाबी आणि ७२ तासात १३४ बाबी काढण्यात आल्या.
७५ – वरोरा विधानसभा मतदार संघात २४ तासात भिंतीपत्रके, पोस्टर्स, कटआऊट / होर्डींग्ज, बॅनर्स, झेंडे, इतर अशा एकूण ८०४ बाबी, ४८ तासात ३०० बाबी आणि ७२ तासात २४३ बाबी काढण्यात आल्या आहेत.