ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल येथे महिला कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा

चांदा ब्लास्ट

आजची परिस्थिती लक्षात घेता भारतातील संपूर्ण कामाच्या ठिकाणी महिलांना लैंगिक छळापासून मुक्त आणि सुरक्षित कामाचे वातावरण प्रदान करणे कायदयाने बंधनकारक आहे. हाच हेतू लक्षात घेता चांदा पब्लिक स्कूल येथे शुक्रवार दि. १९/१०/२०२४ रोजी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ ‘प्रतिबंध आणि निवारण’या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख वक्ते अॅड.वैषाली टोंगे,अॅड.कवाडे यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका आम्रपाली पडोळे यांनी हिरवे रोप देवून स्वागत केले.

कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ आज मोठया प्रमाणावर होत आहे. जगभरातील महिलांना लैंगिक छळाच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे.आणि त्या कृत्यांना आळा घालण्यासाठी कायदयाचे सहकार्य असणे गरजेचे आहे. प्रत्येक स्त्रीला तिचे वय व नौकरीची स्थिती लक्षात घेता सर्व प्रकारच्या छळापासून मुक्त होण्याकरीता कोणकोणता कायदा व कलमांची माहिती कर्मच्यारी स्त्रीला असायला पाहिजे.तसेच लैंगिक छळ झाल्यास कोठे तक्रार करायची या तक्रार निवारण समितीच्या प्रक्रियेबद्दल देखील मार्गदर्शन करण्यात आले. अश्या प्रकारचे कार्यक्रम शाळेच्या संचालिका श्रीमती.स्मिता संजय जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात नेहमीच राबविण्यात येतात.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन रेवती बडकेलवार यांनी केले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व महिला शिक्षक व महिला शिक्षकेत्तर कर्मच्यारी उपस्थित होत्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये