नागभीड पोलीस स्टेशन येथे ७ महिन्यात ४ ठाणेदार,काहींची बदली
मात्र कार्यरत,कर्मचारी कमी असल्याची माहिती.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड पोलीस स्टेशन येथे ७महिन्यात ४ ठाणेदार नेमणूक झाल्याने तालुक्यात वेगळ्या चर्चेला उधाण आले आहे मात्र काही पोलीस कर्मचाऱ्याच्या बदल्या करण्यात आल्या आहेत मात्र अजून त्यांना का? सोडण्यात आले नाही हा एक संशोधनाचा भाग आहे.
नागभीड येथील पोलिस निरीक्षक मेंढे कार्यरत असताना सेवा निवृत्ती तीन महिन्यांवर असताना मुख्यालय चंद्रपूर येथे बदली होऊन सिंदे वाही येथून सहाय्यक पोलीस निरीक्षक घारे घारे रुजू झाले. सहा महिन्यात घारे यांनी विरुर/चिमूर येथे बदली फेब्रवारी महिन्यात झाली त्यानंतर चंद्रपूर येथून विजय राठोड रुजू झाले. लगेच त्यांची शिंदे वाही येथे बदली होऊन नाग भीड येथे काचोरे ६ऑगस्ट रोजी पुन्हा रुजू झाले. मात्र विधानसभा निवडणुकीत काचो रे यांची ५ऑक्टोंबर रोजी भद्रावती येथे नव्याने बदली करण्यात आली असून नवीन पोलीस निरीक्षक राजाराम कोकाटे यांनी पदभार स्वीकारला आहे.
नागभीड पोलीस स्टेशन येथे सहा महिन्यात ४ठाणेदार बदली करण्यात आली असून काही पोलीस शिपाई आणि जमादार यांच्या बदल्या करण्यात आल्या तरी नागभीड येथील पोलिस स्टेशन येथे कार्यरत रुपेश मेडल्लीवर,सोनवणे,अजित शेंडे, रोहित तुमस रे यांच्या बदल्या करण्यात आल्या असल्या कर्मचारी कमी असल्याचे कारणे सांगितले जात आहे. तरी काही कर्मचारी आपल्याला लवकर सोडावे यासाठी प्रयत्न करीत आहेत.