ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध दारूची वाहतुक : बार चालक / मालक यांचेवर कार्यवाही

देशी व विदेशी दारूचा 2 लाख 41 हजारांवर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन परीसरात पेट्रोलींग करीत असताना सिंदी पोलीसांना माहीती प्राप्त झाली की, सिंदी येथील अवैध दारू विकी करणारा शाहरूख पठाण हा त्याचा नौकर सोनु उर्फ सचिन कथलकर दोन्ही रा. सिंदी रेल्वे यांचे सह शहाररूख पठाण याचे अल्टो कारने अवैध रित्या नागपुर हद्दीतील ग्रिन व्हिलेज बार आसोला सांवगी येथुन देशी व विदेशी दारूचे मालाचा साठा सिंदी रेल्वे गावात आनत असल्या बाबत माहीती मिळाल्याने सेलडोह ते सिंदी रेल्वे रोड वरील रेल्वे च्या उडान पुलावर नाकबंदी करूण वाहन थांबवीले असता शाहरूख पठाण हा घटनास्थळा वरून पसार झाला.

वाहन चालवीत असलेला सोनु उर्फ सचिन कथलकर याचे ताब्यातुन 1) एक गोल्डन रंगाची अल्टो चारचाकी गाडी कमांक एम.एच.32 सी. 4618 किमत अदांजे 1,50,000/- 2) 11 खडर्याचे खोक्यात काचेच्या देशी दारूने भरून असलेल्या संत्रा लावनी कम्पनीच्या 180 एम.एल. च्या एकुण 528 शिशा प्रती नग 150/- प्रमाणे एकुण 79,200/- चा माल 3) एका खर्याचे खोक्यात काचेच्या विदेशी दारूने भरून असलेल्या ऑफीसर चॉईस ब्ल्यु कम्पनीच्या 180 एम. एल. च्या एकुण 48 शिशा प्रती नग 250 प्रमाणे एकुण 12,000/- असा एकुण जुमला किमत 2,41,200/- चा माल जप्त करूण सचिन उर्फ सोनु कथलकर रा. सिदी रल्वे, शहरूख पठाण रा. सिंदी रेल्वे, ग्रिन व्हिलेज बारचा चालक / मालक रा. आसोला सावंगी जि. नागपुर यांचेवर अप क्रमांक 341/2024 कलम 65 अ ई 77 अ 82,83 मदाका अन्वये गुन्हा नोद करूण तपासात घेतला.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक डॉ श्री सागर कवडे, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर यांचे सुचने प्रमाणे, ठाणेदार स.पो.नि. श्री संतोष दरेकर यांचे मार्गदर्शनात पो.हवा. आनंद भस्मे, पो.हवा. प्रफल डफ पो.शि कांचन चाफले, पो.शि नितीन न्खाते, पो.शि. समीर आगे, पो.शि. सचिन उईके, पो.शि. उमेश खामनकार यांनी केली. ग्रे.पो.उप. नि. विजय निकम यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये