ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कॅप्टन गुजरकर यांची युवा महोत्सव शिबिराच्या प्रमुख पदी निवड 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : महाराष्ट्र राज्य भारत आणि गाईड यांच्या वतीने नाशिक जिल्ह्यात सिन्नर येथे जी डी एम महाविद्यालयाच्या प्रांगणात सात ऑक्टोबर 11 ऑक्टोबर दरम्यान राज्यस्तरीय युवा महोत्सव कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले असून या युवा महोत्सव शिबिराचे प्रमुख म्हणून महाराष्ट्र राज्य कार्यालयाने रोव्हरचे जिल्हा आयुक्त तथा राज्य समन्वयक कॅप्टन मोहन गुजरकर यांची निवड केलेली आहे.

सदर युथ कार्निवल मध्ये राज्यातून 150 निवडक रोव्हर्स व रेंजर्स सहभागी होणार आहेत. नाशिक जिल्ह्याचे जिल्हा संघटक श्रीनिवास मुरकुटे व जिल्हा गाईड संघटक कविता वाघ या युवा महोत्सव आयोजन समितीमध्ये मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. राज्य सचिव सारिका बांगडकर व राज्यातील पदाधिकाऱ्यांनी सदर शिबिराला शुभेच्छा दिलेल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये