ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाकेबंदी दरम्यान कारसह विदेशी दारूचा 6 लाखांवर मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

      दिनांक 07/10/2024 रोजी रात्र दरम्यान स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील पथक हजर असताना मुखबीर कडून खबर मिळाली की एक लाल रंगाची पुंटो कंपनीची एम.एच.40 ए.सी.7260 नंबरच्या कार नागपूर मधून विदेशी दारू चा माल घेऊन जाम मार्गे वडणेर येथे जाणार आहे. अशा माहिती वरून त्याच्यावर शेडगांव चौक येथे नाकेबंदी करून प्रो. रेड केला असता आरोपी नामे राज अनिल सोमया वय 22 वर्ष व नकुल देविदास आंबटकर वय 35 वर्ष दोन्ही रा.वार्ड क्रमांक -03 वडनेर ता. हिंगणघाट जिल्हा वर्धा यांच्या ताब्यातून सहा खड्यांच्या खोक्यात रॉयल स्टॉग कंपनीच्या 180 एम एल च्या 288 सिलबंद शिश्या व एक लाल रंगाची फियाट कंपनीची पुंटो एम.एच 40 ए.सी.7260 क्रमांकाची कार असा एकूण 6,00,800/- रुपये चा मुद्देमाल जप्त केला, दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

       सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस अंमलदार हमीद शेख, सचिन इंगोले, श्रीकांत खडसे,राजेश तिवसकर, प्रमोद पिसे रामकिसन ईप्पर, आशिष महेशगौरी, विकास मुंडे,अरविंद इंगोले, उदय सोलंकी सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये