ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोलांडी येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

ज्ञानगंगा नित्यानंद आश्रम सेवा समिती आणि गोपालन केंद्र कोलांडी नंदप्पा येथे ६ ऑक्टोंबर रोजी होमिओपॅथिक डॉक्टर श्री के. आर. भोयर यांच्या माध्यमातून होfमिओपॅथिक निःशुल्क आरोग्य शिबिर पार पडले. ह्या शिबिरामध्ये आश्रम परिसरातील कोलांडी , नंदप्पा आणि धर्मारा या गावांमधील दीडशे ते दोनशे रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि त्यांना डॉक्टर साहेबांचे मार्गदर्शन लाभले आणि मोफत औषधी वाटप करण्यात आले.

आश्रमाच्या माध्यमातून असे सेवा कार्य सदैव करण्याचा प्रयत्न संस्थेकडून होत आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने होमिओपॅथिक डॉक्टर श्री भोयर यांनी आपल्या मार्गदर्शनातून रुग्णांना आरोग्य विषयी मार्गदर्शन केले. या शिबिराला यशस्वी करण्यासाठी अनिता पहानपटे वर्षा पाचभाई, कु.वांशिला बोरकुटे तथा प्रवीण गोरघाटे यांनी सहकार्य केले.

त्यासोबतच शिबिराला यशस्वी करण्यासाठी श्री शंकर देवाळकर, धर्मराज पारधे, वसंतराव काळे आणि शकुन काळे, अशोकराव केवट, संजय शिंदे, केशवराव वाघमारे, मोतेवाड, विजय निमकर आणि कोडापे पाटील यांनी परिश्रम घेतले शिबिराची सांगता सर्व रुग्णांना महाप्रसाद देऊन करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये