ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खरकाडा येथे तंटामुक्ती समितीने लावले प्रेमी युगलांचे विवाह

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी तालुक्यातील खरकाडा(पिंपळगाव) येथील बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिर देवस्थान कमेटी तंटामुक्त गाव समिती व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून एका प्रेमी जोडप्यांचा विवाह दिनांक ६ ऑक्टोंबर २०२४रोजी सोमवारला महादेव मंदिर सभागृहात पार पडला. सुरत भरत मेंढारे (२५)राहणार डोरली ( चिचगाव) असे वर मुलाचे नाव असून वैशाली विठोबा गुरुनुले(१८) चिखलगाव चिखलगाव तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर असे विवाह बंधनात अडकलेल्या प्रेमी जोडप्यांची नावे आहेत.

  या प्रेमी जोडप्याचे एकमेकांवर खूप प्रेम होते. मात्र घरच्यांकडून विरोध होत असल्यामुळे त्यांनी खरकाडा येथील बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिर देवस्थान कमिटीकडे लग्न लावून देण्यासाठी आग्रह धरला होता. दोघांच्याही कागदपत्राची पूर्ण पूर्तता करून त्यांचं लग्न दि. ६ ऑक्टोंबर २०२४ रोज रविवारला सायंकाळी सात वाजता . बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिर देवस्थान जवळील सभा मंडपात पार पडला.

यावेळी लग्न समारंभाला बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिराचे अध्यक्ष रवींद्र ढोरे, उपाध्यक्ष राजेश्वर पारधी, सचिव योगेश ढोरे, उपसरपंच ताराचंद पारधी, तुकाराम ठाकरे, मनोज मैंन्द, अशोक वाघधरे, दामोदर मेश्राम, पत्रकार विनोद दोनाडकर, यांच्यासह महिला भगिनीसह गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये