ताज्या घडामोडी

सावली तालुक्यात शोध व बचाव पथकाचा सराव संपन्न

चांदा ब्लास्ट :

सावली:प्रा.शेखर प्यारमवार
सावली तालुक्यातील जवळपास ३४ गावे वैनगंगा नदीकिनारी आहेत. गोसीखुर्द धरणाचा विसर्ग तसेच अतिवृष्टी यामुळे गेल्या ३ वर्षात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये राष्ट्रीय किंवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पथक दाखल होईपर्यंत तात्काळ मदत देण्याच्या उद्देशाने तहसिलदार श्री परिक्षीत पाटील यांनी रबर बोट ची मागणी केली होती. रबर बोट प्राप्त होताच शोध व बचाव कार्याकरिता सावली तालुक्यात टायगर वन्यजीव संरक्षण संस्था सावली या पथकातील स्वयंसेवकांना आसोला मेंढा तलावामध्ये बोट चालविणे व बचाव कार्याचे प्रशिक्षण ११जुन रोज रविवारला देण्यात आले आहे. या पथकामध्ये टायगर वन्यजीव संरक्षण संस्था सावली चे सर्व सदस्य गण
यांचा समावेश आहे. सध्या मान्सून सुरू होण्यापूर्वी सावली तालुक्यात शोध व बचाव कार्यासाठी पथक सज्ज करण्यात आले आहे अशी माहिती तहसीलदार परिक्षीत पाटील यांनी दिले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये