ताज्या घडामोडी

23 लाख 80 हजारांच्या मुद्देमालासह 6 गोवंश तस्करांना अटक – 22 गोवंशाची केली सुटका

तस्करीसाठी वापरण्यात येणारे 5 वाहन ताब्यात - राजुरा पोलिसांची मोठी कामगिरी

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राजुरा पोलिसांनी 13 जुन रोजी सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास तालुक्यातील देवाडा – देवापुर मार्गावर नाकेबंदी करून अवैधपणे 22 गोवंशाची वाहतूक करणारे 5 वाहन जप्त करून 8 आरोपींना अटक केली. सदर कारवाईत एकुण 23 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राजुरा पोलिसांना दिनांक 13 जुन रोजी विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या गुप्त माहितीनुसार सीमावर्ती देवाडा मार्गे गोवंशाची कत्तल करण्याकरिता शेजारील तेलंगणा राज्यात अवैध वाहतूक करण्यात येणार होती. प्राप्त माहितीनुसार सपोनी जोशी ह्यांच्या नेतृत्वात उप निरीक्षक वडतकर ह्यांच्या चमूने देवाडा देवापुर मार्गावर सापळा रचला. ह्या सापळ्यात अवैध गोवंश वाहतूक करणारे तब्बल 5 वाहन अलगद अडकले. संबधित वाहनांची तपासणी केली असता ह्या वाहनांमधून 22 गोवंशाची वाहतूक होत असल्याचे आढळल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करून पिकअप क्र. एम.एच 33 जी 1217, एम.एच.40 सी. डी. 7068, एम.एच. 34 ए.बी. 4322, एम.एच. 34 बी.जी. 3479, एम.एच. 34 बी.जी. 2131 ही वाहने व अनुक्रमे 1) गोपाल समय्या कुदारम वय 52 वर्ष, रा. कोटाळा, ता. राजुरा 2) बालाजी अरुण थोरात वय 28 वर्ष, रा. डोंगरगाव, ता. जिवती 3) दिलीप किसन बावणे वय 35 वर्ष, रा. पांढरपौनी, ता. राजुरा 4) अजय बापू मेंगीनवार वय 25 वर्ष, रा. लक्कडकोट, ता. राजुरा हे सर्व चालक तसेच साद नसीफ सय्यद फैम वय 34 वर्ष रा. गडचांदुर ता. कोरपना व सागर शामराव मडावी, वय 19 वर्ष, रा. कोष्टाळा, ता. राजुरा ह्या दोन क्लिनर ला ताब्यात घेतले तर वाहन क्र. एम.एच. 34 बी.जी. 2131 चा चालक पळून जाण्यात यशस्वी ठरला.

सर्व वाहनांमध्ये मिळुन 22 गोवंश आढळून आले असून त्यांची एकत्रित किंमत अंदाजे 380000/- व जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकत्रित किंमत अंदाजे 2000000/- असा एकुण 2380000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध गोवंश तस्करीत आढळून आलेल्या सर्व आरोपींवर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम  11(1)(d), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5A, 5B व कलम 9, मोटार वाहन (ड्रायव्हिंग) नियम 2017 चे कलम 23 (1) व मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 177 नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये