ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?

पालकांची चौकशी व कारवाईची मागणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातीलतेलंगाना सीमेवरील डोंगरावर असलेल्या कोदेपूर स्वःसांगळा पाटील आश्रम शाळेतील इयत्ता बारावीचा विद्यार्थी जनजातीय कोलाम समूहातील मंगेश जलपती आत्राम वय १७ वर्ष रा आंबेझरी हा पोळ्याच्या सणाला गावाला आला होता व गावावरून पोळ्यानंतर कोदेपूर येथील वस्तीगृहातच या गावातील आश्रम शाळेत चार विद्यार्थी व तीन विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे अशी माहिती मृतकाच्या वडिलांनी दिली शनिवारी सकाळी सात वाजता तो नाश्ता करिता आल्याची माहिती शिक्षकांनी दिली मात्र 11:45 वाजता तो आपल्या मित्रासोबत भोजनासाठी न येता खोलीमध्ये होता अंदाजे बारा वाजता सुमारास वस्तीगृहातच गळफास लावून आत्महत्या केल्याचे सांगितले जाते.

मात्र शाळा व्यवस्थापनाने याबाबतची कोणती माहिती पोलीस प्रशासनाला दिली नाही व त्या मृतकाला स्वास्थ्य केंद्र जिवती येथे आणण्यात आले व त्यांच्या वडिलांना ही माहिती होताच मंगेशला त्या ठिकाणावरून गडचांदूर येथे उपचारासाठी म्हणून ग्रामीण रुग्णालय येथे भरती करण्यात आले असता डॉक्टर आणि त्यांना मृत घोषित केले पात्र एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व शासन केंद्रात शासनाच्या वतीने देशभरात जनजातीय कोलाम समूहासाठी विविध योजना व विकासाचे घोषणा करत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी मध्ये दिरंगाई होत असल्याची चिंता व्यक्त केल्या जात आहे शाळेमध्ये मुख्याध्यापक गुहपाल अधिक्षक यांचे नियंत्रण नसल्यामुळे दुर्गम डोंगरी भागामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे आत्महत्या सारखी घटना ही चिंतनीय बाब आहे नेमका मृत्यू कशामुळे झाला याबद्दल लोकांमध्ये शंका कुशंका असून वस्तीगृहातील विद्यार्थ्यांमध्ये खळबळ माजली असून जलपत आत्राम या परिवारातील होतकरू मुलगा दगावल्यामुळे कुटुंबावर आभाळ कोसळले आहे शाळेमधील विद्यार्थीमध्ये दहशत निर्माण झाली असून व्यवस्थापनाने याबाबत निष्काळजी केल्याचा आरोप समाजबांधवा कडून होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सहसचिव आबिद अली यांनी जलपती आत्राम यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले व कुटुंबाला न्याय मिळेलअसा विश्वास दिला.

यावेळी परिसरातील सर्व नातेवाईक या ठिकाणी उपस्थित होते शनिवारला ग्रामीण रुग्णालय येथे आबिद अली शर्मिक एल्गारच्या आरोग्यचा गोस्वामी यांनी भेट देऊन दुर्लक्ष करणाऱ्या आश्रम शाळा व्यवस्थापन व त्या ठिकाणी असलेल्या शिक्षकांची कसून चौकशी पोलीस विभाग व आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडून करण्यात यावे व जनजाती कोलाम समूहातील कुटुंबाला न्याय देण्यात यावा अशी मागणी केली आहे यावेळी भाऊराव कनाके शंकर सिडाम मारुती मळावीप्रमोद आत्राम भीम बाई आत्राम इत्यादी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये