ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. श्रीकांत भोवते यांची प्रकूर्ती थोडी गंभीर तात्काळ भरती होण्याचा सल्ला

मात्र उपोषण सोडणार नाही असा आत्मविश्वास कायम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना च्या नेतृत्वात 2 ऑक्टों. पासून आमरण उपोषण वर्धा येथे सुरू आहे जुनी पेन्शन जशीच्या तशी लागू करा त्यानंतरच्या सर्व पेन्शन योजना रद्द करा यासाठी एकूण १७ लोकांनी उपोषणाचे शस्त्र उगारले आहे. त्यामध्ये डॉ. श्रीकांत भोवते, सीनेट सदस्य नागपूर विद्यापीठ नागपूर तथा सचिव डॉ बाबासाहेब आंबेडकर टीचर ऑर्गनायझेशन नागपूर हे उपोषणामध्ये सहभागी आहेत.

मागील 3 दिवसापासून अन्न त्याग केला आणि आज 4 था दिवशी जल त्याग केला. जलत्याग केलेला असल्यामुळे डॉ श्रीकांत भोवते सर याची तब्बेत खालावली आहे त्याची sugar level आणि ऑक्सिजन level कमी झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी दवाखान्यांमध्ये तात्काळ भरती होण्यास सांगितले आहे परंतु सरांनी ऍडमिट होण्यास आणि पाणी पिण्यास नकार दिला आहे. आज दोन उपोषण कर्थे यांनी दुपारी भरती करण्यात आले त्यातील एक व्यक्ती ICCU मध्ये भरती झालेला आहे.

आधीच चिंताजनक

आज दिवसभर महाराष्ट्र भरातून मोठ्या प्रमाणत जनतेने भेटी दिल्या आणि असंख्य संघटनांनी आंदोलनाला समर्थन जाहीर करून आंदोलनाला आर्थिक मदत देणगी दिली.

जनतेचा असा आक्रोश बघून सत्ता पक्षातील मां. माजी खासदार रामदास तडस वर्धा येथील आमदार पंकज भोयर यांनी वरिष्ठांशी बोलून सकारात्मक निर्णय घेवू असे सांगितले तर विरोधी पक्षातील राष्ट्रवादीचे खासदार मां. अमर काळे यांनी आज उपोषण स्थळी भेटी दिल्या आणि जाहीरनाम्यात घेण्याचे स्पष्ट केले. उपोषण सुरू होण्याच्या दिवशी पदवीधर मतदार संघाचे आमदार मां. अभिजित वंजारी तसेच मां. आमदार सुधाकर अडबाले उपस्थित होते त्यांनी आज चौथ्या दिवशी उपस्थीत राहून काग्रेस पक्ष्याचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मां. नाना पटोले यांनी त्यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात त्यांनी नोंद घेवू असे लेखी आश्वासन दिले.

 प्रा. सोनल पंचभाई

वर्धा जिल्हा उपाध्यक्ष DBATO

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये