Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काँगेस पक्षाचे नेते देवानंद भाऊ कायंदे यांचे निधन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.अशोक डोईफोडे

श्री गजानन महाराज कृषी व. शैक्षणिक संस्था या शिक्षण संस्थेचे प्रमुख शेतीनिष्ठ शेतकरी, देऊळगाव राजा शहरात कृषी महाविद्यालय, फार्मसी कॉलेज ची सुविधा उपलब्ध करणारे समाजभूषण देवानंद भाऊ कायंदे यांचे दिनांक 03 ऑक्टोबर रोजी रात्री साडे दहा वाजता वयाच्या 65 व्या वर्षी अल्पशा आजाराने पुणे येथील रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.

काँगेस पक्षाचे युवा नेते मनोज कायंदे यांचे ते वडील होते, तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नंदाताई कायंदे यांचे ते पती होते त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, दोन मुली, सुना, जावई,नातवंडे तथा बराच मोठा आप्त परिवार आहे.

त्यांचा अंत्यविधी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता समर्थ कृषी महाविद्यालय चिखली रोड देऊळगाव राजा येथे प्रांगणामध्ये शोकाकूल वातावरणात करण्यात आले. याप्रसंगी विविध राजकीय, सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रचंड जनसागर लोटला होता. देवानंद कायंदे यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये