Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्मृतीशेष विश्वनाथ मुनेश्वर रिपब्लिकन पक्षाचे विचार जगले!” – डॉ. मोहनलाल पाटील 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांचे वडील विश्वनाथ मुनेश्वर यांचे २६ सप्टेंबर २०२४ रोजी दुःखद निधन झाले.ते ८७ वर्ष आयुष्य जगले. स्मृतीशेष विश्वनाथ मुनेश्वर यांनी सविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपाइं विचाराने भीम सैनिक म्हणून कार्य केले.त्यांनी अंधश्रद्धा रुढी परंपरेचा प्रखर विरोध केला.बाबासाहेबांची चळवळ गतिमान करण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्ता म्हणुन मोठा मुलगा महेंद्र मुनेश्वर यांना त्यांनी रिपब्लिकन विचाराने सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्यास प्रोत्साहित केले.तर लहान मुलगा ज्ञानेंद्र मुनेश्वर हे उच्च शिक्षण घेऊन प्राध्यापक म्हणुन धम्म कार्याशी सलग्न आहेत.ते फक्त रिपब्लिकन पक्षाचे विचार जगले.त्यामुळे या दोन्ही मुलांना त्यांच्या आंबेडकरी निष्ठेचा वारसा मिळाला आहे.अशी विनम्र आदरांजली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे राष्ट्रीय महासचिव डा.मोहनलाल पाटील (भोपाळ) यांनी अस्थी विसर्जन व पुण्यानुमोदन कार्यक्रमा प्रसंगी दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते स्मृतीशेष विश्वनाथ मुनेश्वर यांच्या स्मृतींना बापटवाडी,वर्धा येथे अर्पण केली.

वर्धा येथील बुद्ध टेकडी परिसरात दिवंगत विश्वनाथ मुनेश्वर यांच्या अस्थी खड्यात पुरऊन त्यांच्या नावाने बोधी वृक्ष लाऊन अस्थी विसर्जन व पुण्यानुमोदन आदरांजली कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.मोहनलाल पाटील (भोपाळ) यांच्यासह,विद्युत वितरण वर्धा कार्यालयाचे उपविभागीय कार्यकारी अभियंता राजेश खडसे, आंबेडकरी व सामाजिक कार्यकर्ते,सुनील ढाले,रवि गणवीर,कोलोणा चोरे येथील माजी सरपंच श्रीकृष्ण लोहकरे,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष विशाल मानकर,पंचायत समिती देवळी माजी सभापती भगवान भरणे,शेषराव पाटील,भुजंग पाटील,सुहास थूल व विदर्भातील रिपाइं नेते दुवार्स चौधरी(नागपूर),पश्चिम विदर्भ अध्यक्ष संतोष इंगळे(बुलढाणा),समाधान पाटील,बंडू फुळमाली,सतीश इंगळे,सुनिल वणकर आदींनी त्यांच्या बापटवाडी,वर्धा येथिल निवासस्थानी जाऊन रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत विश्वनाथ मुनेश्वर यांच्या स्मृतींना विनम्र आदरांजली अर्पण केली.त्यांची पत्नी श्रीमती लिलाबाई मुनेश्वर,पुत्र महेंद्र मुनेश्वर,प्रा.ज्ञानेंद्र मुनेश्वर व संपूर्ण मुनेश्वर कुटुंब व आप्त नातेवाईक यांचे सत्वन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये