Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथील साळीवाडा परिसरातून बुलेटची चोरी

अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा शहरातील साळीवाडा परिसरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा क्रमांक १ समोरून दिनांक २८ सप्टेंबर रोजी रात्री १२ ते दिनांक २९ सप्टेंबर सकाळी ६ वाजेच्या दरम्यान मधुकर रायमुल यांच्या घरासमोरून चॉकलेटी रंगाची रॉयल इनफिंट कंपनीची बुलेट क्रमांक MH 28 AR 3722 किंमत १ लाख 63 हजार रुपये ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली, दिनांक 30 सप्टेंबरला रोजी दुपारी १२ः३० वाजता मधुकर रायमुल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज्ञात चोराविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल देवीचंद चव्हाण करीत आहे .

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये