Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दीनदयाल विद्यालयाच्या देखाव्यांना प्रोत्साहन समितीकडून भरघोस बक्षीसे!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 स्थानिक दीनदयाल महाविद्यालयात गणेश विसर्जन मिरवणूकीत सादर करण्यात आलेल्या विविध देखाव्यांना श्री गणेशोत्सव प्रोत्साहन समिती दे.राजा यांच्या वतीने दि.२९ सष्टेंबर रोजी ११ वाजता दिनदयाल महाविद्यालयात आयोजीत कार्यक्रमात बक्षीस वितरण करण्यात आले.

    श्री गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीत इयत्ता ५ वी ते१२ वी च्या विद्यार्थ्यांकडून वर्गशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध आशयाचे एकूण २० देखावे सादर करण्यात आले होते. यादेखाव्यांमधे समाजप्रबोधनपर,चालू घडामोडी,भारतीय संस्कृती व परंपरा यांची ओळख करुण देणाऱ्या देखाव्यांचा समावेश करण्यात आला होता.या देखाव्यांचे परिक्षण व निरिक्षण श्री.गणेशोत्सव प्रोत्साहन समिती दे.राजा यांच्या कडून करण्यात आले.या समितीकडून सर्वोत्कृष्ट पाच देखाव्यांना बक्षीसे देण्यात आली,प्रथम क्रमांक ‘ कावड यात्रा,नारी वंदन वर्ग ८ब,द्वितीय क्रमांक कृष्णलीला वर्ग ७ ब,तृतीय क्रमांक योग एक आदर्श जीवनशैली वर्ग- ९ ड, चतुर्थ क्रमांक सायकल चालवा पर्यावरण वाचवा वर्ग ९ ब आणि स्त्री संरक्षण काळाची गरज या वर्ग ९ क च्या देखाव्यास पाचव्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले.

सदर देखाव्यांना समितीच्या वतीने प्रमाणपत्र व रोख पारितोषिके देवून गौरविण्यात आले तसेच उर्वरित देखाव्यांनाही प्रोत्साहनपर बक्षीसे देण्यात आली. आकर्षक देखाव्याचे सादरीकरण केल्यामुळे शाळेचे प्राचार्य सुरेश गारडे यांचा शाल व सन्मान चिन्न देऊन गणपती उत्सव समिती कडून सन्मानीत करण्यात आले.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गणेश उत्सव प्रोत्साहन समिती अध्यक्ष राजेश भुतडा होते, त्याचबरोबर प्रोत्साहन समितीचे सदस्य ॲड घनःशाम भाला, ‘ सूरज गुप्ता, सुषमा राऊत,प्रभाकर खांडेभराड.गोविंदराव झोरे, मधूकर रायमूल ‘ संचित धन्नावत, विनायकराव कुळकर्णी ‘बाबासाहेब मिनासे आदी उपस्थित होते तद्वतच महाविद्यालयाचे प्राचार्य एस.बी.गारडे, पर्यवेक्षक.एस.एन.व्यास, पी.बी.ठाकूर,प्रा. संदीप डोईफोडे सुधाकर जायभाये,यांच्यासह सर्व प्राध्यापक प्राध्यापिका,शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी बंधू भगिनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज गुप्ता यांनी केले व आभार प्रदर्शन ठाकूर सर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये