Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रीय महामार्ग वरील मौजे कुंभारी येथील पुलाजवळील रस्त्यामध्ये असलेले विद्यूत वाहिनी पोल तात्काळ हटवा 

अन्यथा 2ऑक्टो.2024 रोजी तहसीलदार यांचे दालनात उपोषण करण्याचा संतोष पाटील बंगाळे यांचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा चिखली राष्ट्रीय महामार्ग क्र.753 ए मार्गावर दररोज हजारो वाहणांची दिवस रात्र रहदारी असल्याने प्रचंड व्यस्त असलेल्या या महामार्गावरील कंत्राटदाराच्या निष्काळजीणामुळे मौजे कुंभारी ता.देऊळगावराजा जि. बुलडाणा येथील पुलाजवळील 33 के व्हि व 11 के व्हि विद्युत वाहिनी पोल महामार्गाच्या मध्ये येत असताना सुद्धा कंत्राटदाराने दुर्लक्ष करत महामार्गाचे बांधकाम सुरु असतांना इतरत्र न हलवता पोल रस्त्यात घेऊन काम पूर्ण केले.

सदर मार्गांवरून चिखली येथून दे.राजाला येतांना उतारात वळण असल्याने अतिवेगात असलेल्या वाहनांना रस्त्यावरिल पोल लक्षात येत नाही म्हणून अपघात होत आहेत. तसेच सदर विद्युत वाहिनी पोल मधून अविरतपणे विद्युत पुरवठा सुरु असल्याने सदर पोलवर जड वाहने आदळल्यास मोठा अपघात होऊन महामार्गावरिल कुंभारी गावासह देऊळगावराजा परिसरातील नागरिकांची प्रचंड मोठ्या प्रमाणावर जीवित हानी झाल्याशिवाय राहणार नाही तसे झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी देऊळगावराजा व तहसिलदार देऊळगाव राजा यांची राहील, तेव्हा मौजे कुंभारी ता.देऊळगावराजा जि. बुलडाणा येथील पुलाजवळील रस्त्यातील विद्युत वाहिनी पोल तात्काळ इतरत्र हलवण्याबाबत कार्यवाही करावी अन्यथा तहसिलदार यांच्या दालनात 2ऑक्टोंबर रोजी उपोषण करण्यात येइल असा इशारा मा साहेब जिजाऊ मल्टिपरपज फाउंडेशन चे अध्यक्ष संतोष पाटील बंगाळे यांनी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये