Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षणातूनच भोई समाजाची प्रगती : राष्ट्रपती हस्ते पुरस्कृत आशा बावणे (सोनुने)

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     आपला भोई समाज बहुतांशी व्यसनी आहे. त्यामुळे तो गरीब आणि अशिक्षित आहे. समाजाने व्यसन त्यागून शिक्षणाला जवळ केले पाहिजे त्यातूनच समाजाची प्रगती होईल. असे विचार सहाय्यक आरोग्य अधीसेविका आशा बावणे (सोनुने) यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना म्हटले.

          त्यांचा नुकताच दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते सत्कार पार पडला. आरोग्य सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मानित केल्या गेले. गडचिरोली सारख्या दुर्गम भागात आरोग्य विभागात नोकरी करून त्यांना हा मान मिळाला. हे औचित्य साधून स्थानिक बालाजी सभागृहात मच्छिंद्र मच्छुआँ सहकारी संस्थेच्या वतीने आशा बावणे (सोनुने) यांचा सत्कार करण्यात आला. त्यापुढे त्या म्हणाल्या की आपल्या आई-वडिलांकडील परिस्थिती खूप हलाखीची होती. मोलमजुरी करून मी शिक्षण घेतले. त्यातून नोकरी मिळाली आणि आपल्या परीने केलेल्या कार्याला राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेल्या पुरस्काराने पावती मिळाली. त्या भोई समाजाच्या असल्याने त्यांचा या गौरवपूर्ण कामगिरीबद्दल शाल, श्रीफळ व भोई समाजरत्न पुरस्कार देऊन मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष दिलीप मांढरे यांच्या हस्ते सन्मामित करण्यात आले.

यावेळी सभाअध्यक्ष शंकर नागपुरे, संस्थाअध्यक्ष दिलीप मांढरे, संस्थेचे सचिव संभाजी मांढरे, उपाध्यक्ष शंकर कामतवार,समस्त संचालक सुरेश मांढरे, नंदू पढाल, श्रीराम नागपुरे, मंदा मांढरे, संगीता नागपुरे,सुलोचना मांढरे, राजेंद्र बगडे ,संतोष नागपुरे,भारत नागपुरे,राखी नागपुरे आदी उपस्थित होते. त्यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात श्री संत झिंगुजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आमसभा व सत्कार सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदू पढाल, संचालन व आभार गौरव नागपूरे यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये