Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बँक ऑफ इंडिया वनसडी शाखेत ग्राहक अधिकाऱ्याची तारांबळ

कोरपना येथे राष्ट्रीयकृत बँक शाखा उघडा    

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

          कोरपणा तालुक्याच्या ठिकाणी अनेक शासकीय कार्यालय तहसिल कार्यालय पंचायत समिती न्यायालय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दुय्यम निबंधक कृषी उत्पन्न बाजार समिती तालुक्याची मुख्य बाजार पेठ आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षापासून येथे राष्ट्रीयकृत बँक शाखा नसल्याने ग्राहकांना गडचांदूर किवा वनसडी १० ते २० कि.मी. अंतरावर जोखीम घेऊन बँक व्यवहार हाताळावे लागतात. कोरपना तालुक्याच्या पूर्वे दिशेला आवाळपूर वनसडी गडचांदूर कवठाळा येथे राष्ट्रीयकृत बँक शाखा आहेत.

वनसडी बँक शाखेत तालुक्याचे शेवटचे तेलंगणा सिमेवरील परसोडा मांगुलहीरा या परिसरातील नागरिकांना वनसडी शाखेत जाण्यासाठी २५ ते ३० कि.मी अंतर गाठावे लागते वनसडी परिसरातील ३२ ग्राम पंचायत विविध संस्था तसेच शासनाचे अनेक योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविण्याचे धोरण असल्याने वनसडी बँक ऑफ इंडिया शाखेत जागा अपूरी ग्राहकांना तास:तास ताटकळत उन्हा-पावसात बाहेर थांबावे लागते शाखेत जागेचा व कर्मचाऱ्याचा अभाव यामुळे शाखेत जत्रेचे स्वरूप येऊन ग्राहकाची गैरसोय व कर्मचाऱ्याची तारांबळ उडत असते अनेक ग्राहकाचे वेळेवर काम होत नाही.

यामुळे बँक कर्मचाऱ्यांना नाराजी ओढून घ्यावे लागते बँकेची गर्दी पाहता एखादया वेळी चेंगराचेंगरी घडल्यास नवल ठरणार नाही परिसर व व्यापार पेठेचा विचार करता कोरपना येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा देण्यात यावे तसेच वनसडी येथे विस्तारीत इमारती मध्ये शाखा सुरु करण्यात यावी. अशी मागणी आबिद अली यांनी अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तथा मुंबईचे रिजर्व बँक संचालक निरज निगम यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये