Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सौ. मयूरी विशाल शिंदे यांना पीएच. डी. पदवी बहाल

संशोधनपर शोधप्रबंध स्कोपस इडेक्स डब्लु. ओ. एस. तसेच यू.जी.सी. सारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शोध पत्रिकेत प्रकाशित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        सौ. मयूरी विशाल शिंदे यांना नुकतीच गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील संगणक विभागातील आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. त्यांचा विषय “INFORMATION STREAM METHODS FOR CLUSTER ANALYSIS TOWARDS EVALUATING STANDARD SYNTHETIC DATA STREAM AND AUTHENTIC LIFE DATA STREAMS” हा होता . निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. मोहिनूद्दीन कादरी तसेच प्राध्यापक डॉ. एस. बी. किशोर सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे प्रबंध सादर केला होता. दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या तेराव्या वर्धापन दिन व अकरावा व बारावा दीक्षांत समारंभात विद्यापीठाच्या परिसरातील सभागृहात श्री. सी.पी. राधाकृष्णन, माननीय कुलपती तथा राज्यपाल महाराष्ट्र राज्य तसेच श्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री महामार्ग व रस्ते वाहतूक, भारत सरकार, डॉ. प्रशांत बोकारे, कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली तसेच डॉ. श्रीराम कावळे, प्र. कुलगुरू यांच्या प्रमुख उपस्थितीत पी.एच.डी पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

सौ. मयूरी विशाल शिंदे यांचे संशोधनपर शोधप्रबंध स्कोपस इडेक्स डब्लु. ओ. एस. तसेच यू.जी.सी. सारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शोध पत्रिकेत प्रकाशित झाले असून अनेक परीसंवाद व परिषदांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. या संशोधनाचा उपयोग वैद्यकीय व बँकिंग या सारख्या क्षेत्रात करता येणार आहे.

त्यांनी आपल्या यशाचे श्रेय

भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे संस्थापक सचिव स्वर्गीय नीलकंठराव शिंदे, (माजी आमदार) व तत्कालीन अध्यक्ष श्रीमती नीलिमा ताई शिंदे, वडील श्री. गणेशराव घोडमारे, आई सौ. छबूताई घोडमारे तसेच पती प्राध्यापक डॉ. विशाल शिंदे यांना दिले. त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे समस्त विश्वस्त मंडळ तसेच यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयीन प्राचार्य, शिक्षक, प्राध्यापक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे व त्यांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये