Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बीजेएस महाराष्ट्रचा कोकणमधे पारिवारिक स्नेह मिलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

    बीजेएस महाराष्ट्र चा कोकणमध्ये दोन दिवसीय पारिवारिक स्नेह मिलन गेट टुगेदर समारोह नुकताच 28/29सप्टेंबर रोजी संपन्न झाला. बीजेएस चा यशस्वी उपक्रम कोकण विभागात संस्थापक शांतीलालजी मुथा यांच्या संकल्पनेतून साकारला गेला.

   यात राज्य अध्यक्ष नंदकिशोर सांखला व राज्य सचिव दीपक चोपडा सहित तीन राज्य उपाध्यक्ष, राज्य कार्यकरिणी सदस्य,पदाधिकारी असे एकूण राज्यातील 30 दंपत्तीनीं सहभाग घेतला.बीजेएस परिवारातील प्रमूख आपल्या दैनंदिन कौटुंबिक व व्यवसायिक जबाबदारीत व्यस्त असतो. त्याला विरंगुळा म्हणुन व एकमेकांच्या भेटी गाठी साठी दोन दिवसीय पारिवारिक स्नेह मिलन समारोहाचे आयोजन कोकण विभागाने केले होते. सर्व आगुंतांचे कोकणी टोपी व माळा घालून स्वागत केले गेले.

   स्वागतानंतर अतिशय स्वादिष्ट जैन भोजनाचा आस्वाद घेत पहिल्या दिवशी करदे मुरुड समुद्र किनाऱ्या वरील ॲक्टिव्हिटी चा आनंद घेतला. रात्री मनोरंजनासाठी सूरज जाधव यांनी लाईव्ह म्युझिक सह संगीत रजनी सादर केली सर्व आलेल्या पाहुण्याचे सपत्नीक परिचय देत पुष्प देऊन स्वागत केले .राज्य अध्यक्ष आदरणीय नंदकुमार जी सांखला यांची भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडीसाठी संपूर्ण कोकण विभागातर्फे शाल श्रीफळ देऊन स्वागत कऱण्यात आले .लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात सुद्धा सोबत कऱण्यात आले. प्रमुख उपस्थिती प्रा.चंद्रकांत डागा, अशोक राखेचा (शिंदखेडा),मनसूख  चोरडिया(श्रीरामपूर ) सन्मती जैन, (देऊळगाव राजा),सचिन ओसवाल (अमळनेर), अभय शहा, किशोर जैन,संतोष उमाटे, कोस्तुभ संगवे,उत्कर्ष संगवे, कंचनबाला संगवे (लातूर),आनंद भंडारी (शिर्डी), महेंद्र मंडलेचा(चंद्रपूर) ऋषभ बरडीया(परतवाडा), गौतम संचेती, प्रविण पारख,किशोर ललवाणी, अनिल संचेती (छ. संभाजी नगर), कांतीलाल ओसवाल (सिल्लोड), संजय अंचालिया (अमरावती),अमृत पारख,गौतम मुथा ,अशोक ढेलरिया,अभय शहा (इचलकरंजी), नंदकिशोर सांखला,दीपक चोपडा, अभय ब्रम्हेचा, जवरीलाल कोठारी,चंद्रशेखर चोरडिया, ललित सुराणा, रोशन टाटीया (नासिक) यांचा समावेश सपत्नीक होता.

मरणोत्तर नेत्रदान, अवयव दान बाबत कोकण टीम ने जनजागृती करुन, फॉर्म भरण्याचे आवाहन केले.कोकण टीम ने यासाठी संपूर्ण भारत वर्षातील सकल जैन समाजातील नागरीकासाठी ऑन लाईन 1 लिंक तयार केलेली आहे या लिंक वर सकल जैन समाजातील प्रत्येक व्यक्तीने संपूर्ण माहिती भरून मी मरणोत्तर नेत्रदान करणार असा संकल्प करावयाचा आहे.

    दुसऱ्या दिवशी आंजर्ला येथील कड्यावरील गणपती मंदिर, सावणे येथील 57 मिटर ऊंच असलेले दीप स्तंभ, सावणे बीच दर्शन, श्री भगवान परशुरामजी पुतळा दर्शन, चंडिका देवी मंदिर दाभोळ येथे आरती करण्यात आली. सायंकाळी दाभोळ बंदरात मोकल परिवाराच्या सहकार्याने हाऊस बोट वर गीत संगीताच्या तालावर नाचत गात सर्व आबाल, ज्येष्ठ दांपत्यानी ठेका धरला .अनेक ठिकाणी भेटी दिल्या.

   राज्य अध्यक्ष व आगामी राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर सांखला म्हणाले, भारतीय जैन संघटनेत अमुलाग्र बदल होत आहे. हे पारिवारिक स्नेह मिलन त्याचाच एक भाग आहे. संघटनेत कार्यकर्ते तयार केले जातात. त्यांच अनुभवातून उत्तम नेता घडविण्याचे कार्य संघटनेमार्फत निरंतर चालू आहे. प्रगत सुखी समृध्द देश निर्माण करण्यासाठी बिजेएस ने फार मोठे कार्य हाती घेतले आहे.

हे गेट टुगेदर यशस्वी करण्यात कोकण  विभाग अध्यक्ष चेतन जैन (गुगलिया),सचिव मनोहर पितलीया,रत्नागिरी जिल्हाध्यक्ष योगेश पोकरणा ,सचिव मुकेश सामरा, दापोली शहराध्यक्ष महेश सालेचा,सचिव प्रमोद बंबकी, खजिनदार राहुल दक , संतु जैन, प्रवीण जैन, दिपक जैन, विरेंद्र जैन,धीरज जैन,यांनी विशेष परिश्रम घेतले. दापोली महीला आघाडी ने सुद्धा कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली कार्यक्रमासाठी खेड, चिपळूण येथून सुद्धा पदाधिकारी उपस्थित होते.

असे कार्यक्रम सतत होणे गरजेचे आहे असे सर्वांचे मत होते.मोरे कुटुंबाचे हॉटेल सागर सावली ग्रँड यांनी संपूर्ण कांदा लसूण विरहित जैन पद्धतीचे जेवण, स्वतंत्र व्हेज किचन उभारून हसतमुख सेवा दिली म्हणून त्यांचे पण मनापासून आभार मानण्यात आले .समुद्र किनारी उत्तम व्हेज जैन फूड आम्ही देऊ शकतो असा आत्मविश्वास देऊन, कोकणात जास्तीत जास्त पर्यटक येऊन येथील पर्यटन व्यवसाय वाढला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

येणाऱ्या सर्व मान्यवरांनी निसर्ग सौंदर्याने नटलेल्या स्वर्गीय, स्वर्णीम सुंदर कोकणचे तोंड भरून कौतुक केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये