Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रम्हपूरी येथे ३ आॅक्टोंबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विचारवंत तुषार गांधी, विचारवंत निरंजन टकले, प्रा. सुरेश द्वादशीवार यांची राहणार प्रमुख उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची २५५ वी जयंती ०२ आक्टोंबर ला संपूर्ण देशभर साजरी केली जाणार आहे. त्याच अनुषंगाने ब्रम्हपुरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती महोत्सव व व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजीत केला आहे. दि. ३ आक्टोंबर २०२४ ला सायकांळी ५.३० वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर जाहीर व्याख्यान सत्याग्रह : माणुसकीच्या शत्रुसंगे युध्द आमूचे सुरू या विषयावर निरंजन टकले विचारवंत व लेखक, तुषार गांधी विचारवंत, प्रा. सुरेश ‌द्वादशिवार विचारवंत यांचे व्याख्यान राजीव गांधी सभागृह कुर्झा रोड ब्रम्हपुरी येथे आयोजीत केले आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडे‌ट्टीवार उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रम प्रसंगी प्रा.डॉ. देवीदासजी जगनाडे, प्रा. सुभाष बजाज, डॉ नामदेव कोकोडे, अॅड. गोविंदराव भेंडारकर, हरीश्चंद्रजी चोले, खेमराज तिडके, हितेंद्र राऊत, प्रभाकर सेलोकर, सुधाकर पोपटे, डाॅ.राजेश कांबळे, प्रमोद चिमुरकर, मोंटु पिलारे, विलास विखार, डॉ.थानेश्वर कायरकर, सोनू नाकतोडे, मंगला लोनबले, योगिता आमले, सुरज मेश्राम, जाकीर शेख आदी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.

दि. ०२ आक्टोंबर २०२४ ला बुधवार रोज सकाळी ८.०० वाजता हुतात्मा स्मारक ते महात्मा गांधी पुतळा बाजार चौक अशी पदयात्रा आयोजित केली आहे. त्यात गांधीजींच्या जीवनावर आधारित प्रबोधनपर झाकीचे आयोजन केले आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

पत्रकार परिषदेला राष्ट्रपिता महात्मा गांधी समीतीचे संयोजक ॲड गोविंद भेंडारकर, प्राचार्य डॉ. देविदास जगनाडे, नारायणराव बोकडे, अतुल राऊत, निनाद गडे, ॲड. आशिष गोंडाणे, रवी पवार, मनमोहन मिसार, राहुल मैंद आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये