Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शासकीय औ. प्र. संस्थेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळावा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

     जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वर्कशॉप सभागृहात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

       अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य आर.बी. वानखेडे होते. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वैभव बोनगीरवार, आयएमसी सदस्य श्री. दिलीप वावरे, दिलीप झाडे, चंद्रपूर शास.औ. प्र. (मुलींची)चे प्राचार्य कल्पना खोब्रागडे , वरोरा येथील संस्थेचे प्राचार्य भालचंद्र रासेकर, भद्रावती संस्थेचे प्राचार्य प्रणाली डहाटे, बल्लारपूर संस्थेचे गटनिदेशक निदेशक श्री लेडांगे, श्री. हितश नंदेश्वर, कौशल्य विकास व मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे आदींची उपस्थिती होती.

  मेळाव्याचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर यांनी केले. याप्रसंगी वैभव बोनगीरवार म्हणाले की, शासनाचा हा उपक्रम नवयुवकांना शिकण्याची व आपले कौशल्य विकसित करण्याची संधी देणारा आहे, असे ते म्हणाले.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य वानखेडे यांनी उपस्थित युवकांना युवा प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. उद्योजक दिलीप वावरे आणि दिलीप झाडे यांनी आपले स्वानुभव कथन केले तर उपस्थित अतिथींनी समयोचित विचार व्यक्त केले. या मेळाव्यात ८ उद्योजक आणि २३३ उमेदवार प्रामुख्याने उपस्थित झाले होते.

    सूत्रसंचालन निदेशक पियुष केने यांनी केले तर आभार प्रदर्शन गटनिदेशक एन. एन. गेडकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी प्रशिक्षणार्थांनी सहभाग घेतला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये