Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये नागपूर विभागातून ब्रम्हपुरी नगर परिषद तृतीय क्रमांकावर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा अभियानामध्ये ब्रम्हपुरी नगर परिषद नागपूर विभागातून २५ ते ५० हजार लोकसंख्या गटातून “तृतीय क्रमांक” तर राज्यातून ३८ वा क्रमांक पटकावून बक्षीस रक्कम ५० लक्ष रुपयांचे मानकरी ठरले.

  सदर अभियानात राज्यातील एकूण ४१४ स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग नोंदविला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियानाच्या कालावधीत केलेल्या कामांचे डेस्कटॉप मुल्यांकन व फिल्ड मुल्यांकन त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्यात आले. या दोन्ही मुल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे माझी वसुंधरा अभियान ४.० मधील लोकसंख्यानिहाय विजेत्या स्थानिक स्वराज्य संस्थांची २७ सप्टेंबर २०२४ रोजी निवड करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

यामध्ये निसर्गाच्या पंचमहाभूतातील भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश संवर्धन यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सदर पुरस्कारासाठी सर्व न.प. अधिकारी / कर्मचारी, विशेषतः स्वच्छता कर्मचारी व ब्रम्हपुरी नगर वासीयांचे सहकार्य लाभले. या अभियानामध्ये यशस्वी कामगिरी बजावणाऱ्या आरोग्य व स्वच्छता विभागावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. यासाठी मा. प्रशासक तथा मुख्याधिकारी श्रीमती अर्शिया जुही, कार्यालय अधिक्षक श्री मंगेश बोंद्रे, स्वच्छता निरीक्षक तथा स्वच्छ सर्वेक्षण विभागाचे नोडल अधिकारी श्री नितीश रगडे, लिपिक श्री धनंजय हटवार, शहर समन्वयक श्री प्रविण काळे, तांत्रिक सहाय्यक तनवीर खान पठान, मुकादम श्री भीमराव जनबंधू, श्री गुलाब खोब्रागडे, श्री धनराज वनकर व सर्व स्थायी व कंत्राटी सफाई कामगार यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये