Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उद्या भव्य शेतकरी जन आक्रोश धरणे आंदोलन

डॉ. अभ्युदय मेघे यांचे आयोजन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य उत्पादन करसावर आधारित हमीभाव मिळाला पाहिजे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी ओला दुष्काळात लवकरात लवकर जाहीर करावा अशा अनेक मागण्यासाठी सेलू येथे विकास भवन चौकात सकाळी 10.30 ला भव्य शेतकरी जन आक्रोश धरणे आंदोलन आयोजन करण्यात आले आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सरकार दरबारी मांडणार आहे. यावर लवकरात लवकर उपायोजना करावे यासाठी तहसीलदार सेलू यांच्या माध्यमातून निवेदन देखील देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला ग्रामीण भागातील जास्तीत जास्त शेतकरी,शेतमजूर, युवक युवती माता-भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाविकास आघाडीचे नेते डॉ.अभ्युदय मेघे, छोटू भाऊ चांदुरकर,सुनील राऊत,प्रमोद बोंबले, महेश मुनेश्वर,यशवंत झाडे, निहाल पांडे, तुषार उमाळे, नितेश कराळे, सुधीर पांगुळ,समीर देशमुख शेखर शेंडे ,रंजन मिश्रा अमर भाऊ गुंडी अविनाश काकडे सुदाम पवार विठ्ठल झाडे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये