Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भीम आर्मीची भद्रावती शहर कमिटी गठीत

शहर अध्यक्षपदी थॉमस दुधे तर महिला अध्यक्षपदी भाग्यश्री पवार यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         भीम आर्मीच्या भद्रावती शहर कमिटीचे गठन करण्यात आले असून शहर अध्यक्ष म्हणून थॉमस दुधे यांची तर महिला अध्यक्षपदी भाग्यश्री पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय कार्यकारणीत उपाध्यक्ष मिलिंद रामटेके, महिला उपाध्यक्ष अंजली आवटे, शहर सचिव रोशन पेटकर, महिला सचिव शीला जुमडे, शहर सहसचिव सुरज बाराहाते, शहर संघटक संकेत चिमूरकर,शहर मीडिया करण सोंडवले, शहर प्रभारी अजेंद्र ढोक आदींचा समावेश करण्यात आला आहे.

यावेळी राज्य माजी महासचिव शंकर मुन, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद शिंदे, राजरतन पेटकर आदींची उपस्थित होती. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये