ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती-वरोरा महामार्गावरील खड्डे बुजवा : अन्यथा आंदोलन

मनसेचे नांदोरी टोल नाक्यावर निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

नागपूर-चंद्रपूर या महामार्गावर भद्रावती ते वरोरा दरम्यान मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढुन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

या रस्त्यावर वाहन चालविणे धोकादाय झाले आहे. त्यामुळे या महामार्गावरील खड्डे त्वरित बुजवून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा या विरोधात मनसे स्टाईलने आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा मनसेतर्फे दि. 22 सप्टेंबर 2024 रोजी नंदोरी टोलनाक्यावर टोल वेवस्थापकास सादर करण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

सदर निवेदन मनसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या मार्गदर्शनात शहर अध्यक्ष युगल ठेंगे यांनी दिले. यावेळी अप्पू मांडवगडे, ओम झोडे, प्रफुल बेलेकर, जितू खामकर व इतर मनसैनिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये