ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाण्याची मोटर चालू केल्याच्या कारणावरून महिलेस मारहाण 

३ आरोपीविरोधात गुन्हा दाखल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

येथून जवळच असलेल्या असोला जहांगीर शिवारात सामाईक विहिरीतील पाण्याची मोटर चालू का केली या कारणावरून एका महिलेस मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना १६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३०वाजता घडली, पोलिसांनी ३ आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, आसोला जहांगिर शिवारात गट नं 202 मध्ये सामाइक विहीर असुन विहीरीतील पाण्याची मोटर चालु का केली या कारणावरुन फिर्यादी गजानन लक्ष्मण मांटे च्या पत्नीस आरोपी गणेश मांटे याने कु-हाडीचे दांडयाने मारहान करुन जखमी केले, इतर आरोपी द्वारकाबाई मांटे, सागरबाई मांटे यांनी शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.

पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी ३ आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्लये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ काकड करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये