Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विश्व हिंदू परिषदे तर्फे हिंगणघाट येथील अरमान धनरेलचा सत्कार !

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा (जि.प्र)जिल्ह्यातील हिंगणघाट येथील महावीर वॉर्ड येथे राहणारा अरमान दिनेश धनरेल याचा हिंगणघाट विश्व हिंदू परिषद ,बजरंग दल तर्फे जुडो या खेळात राज्यस्तरीय निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला ..अरमान हा नागपूर विभागमधून जुडो या खेळात निवड झालेला हिंगणघाट येथील महावीर वॉर्ड मधील आणि बिडकर कॉलेज मधील विद्यार्थी आहे .नागपूर येथे झालेल्या मानकापूर स्टेडियम मधील जुडो स्पर्धेत त्यांनी राज्यस्तरीय जुडो स्पर्धेसाठी मजल मारली त्या प्रित्यर्थ त्याचं हिंगणघाट प्रखंड विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तर्फे दुपट्टा, पुष्पगुच्छ आणि कृष्ण भगवान चा फोटो देऊन सत्कार करण्यात आला.

या वेळेस विहिंप जिल्हा सहमंत्री शरद कोणप्रतिवार, हिंगणघाट प्रखंड सहमंत्री अजय भोंग,हिंगणघाट प्रखंड धर्माचार्य संपर्क प्रमुख नंदकुमार सिंगरू, हिंगणघाट प्रखंड मठ मंदिर अर्चक पुरोहित प्रमुख रवींद्र खंडाळकर, हिंगणघाट नगर विहिंप अध्यक्ष गजानन मसाये,हिंगणघाट नगर विहिंप मंत्री राम पोतदार ,दिनेश धनरेल उपस्थित होते …

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये