Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्तमान पिढीने मुक्तीसंग्राम दिनातून सतत प्रेरणा घ्यावी – हंसराज अहीर

मराठवाडा मुक्तीसंग्राम वर्धापनदिनी कोरपना येथेध्वजारोहण 

चांदा ब्लास्ट

मराठवाडा, हैदराबादमुक्ती संग्राम दिनाचा वर्धापन सोहळा हा विजयोत्सव असून या मुक्ती संग्राम दिनाचेस्मरण वर्तमान व भावी पिढयांनी ठेवून अन्याय, अत्याचाराविरूध्दसंघर्ष करण्याची वृत्ती अंगीकारावी देशाला विकासाची गरज असून मा. नरेंद्र मोदीयांची दूरदृष्टी व भरीव कर्तृत्वामुळे भारत आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचालकरीत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीयगृह राज्यमंत्री हसराज अहीर यांनी केले.कोरपना येथे दि. १७सप्टेंबर २०२४ रोजी भाजपाच्या वतीने आयोजित मराठवाडा मुक्ती संग्राम वर्धापन दिनसोहळाप्रसंगी ध्वजारोहण करून ते उपस्थिताना संबोधित करीत होते.

 या कार्यक्रमासमाजी आमदारद्वय अॅड संजय धोटे, सुदर्शननिमकर, खुशाल बोंडे, देवराव भोंगळे,अरूण मस्की, अॅड प्रशांत घरोटे, संजय मुसळे, रमेश मालेकर, सुरेशकेंद्रे, शिवाजी सेलोकर, किशोर बावने,अरूण मडावी, निलेश ताजणे, सतिश उपलेंचवार, अमोल आसेकर, राहुलसुयवंशी, जिबने आदी मान्यवराची मंचावर उपस्थिती होती.आपल्या संबोधनात हंसराजअहीर म्हणाले की, १९४८ मध्येआजच्या दिवशी झालेल्या निजाम संस्थानच्या मुक्ती दिनाचे महत्व अनन्यसाधारण असून आजआपण खरे स्वातंत्र्य जगतो आहोत. देशात मा नरेंद्र मोदी याच्या दहा वर्षांच्यासत्ताकाळात देशाने सर्वच क्षेत्रात विकासाची उत्तुग झेप घेत जगातील ५वीअर्थव्यवस्था म्हणून लौकीक मिळविला आहे.

शेतकरी, युवक,महिला व सर्वसामान्याच्या हिताचे शेकडो निर्णय घेवून या घटकाना आर्थिकसपन्नतेच्या दिशेने नेण्याचे कार्य केंद्र सरकारने केले आहे. याच कार्याचा भागम्हणून केंद्र व महायुती सरकारच्या काळात जिवती, कोरपना यादुर्गम भागाचा विकास झाला.किमान आधारभूत मुल्यवाढकरून शेतकऱ्याचे हित जोपासले, खतांच्याकिंमती स्थिर राखल्या या क्षेत्रामध्ये केंद्रीय निधीतूनसव्वाशे करोड रूपयाची कामे करण्यात यश मिळाल्याचे अहीर यांनी यावेळी सांगितले. यामुक्तीसंग्राम दिनानिमित्त माजी आ. संजय धोटे, सुदर्शन निमकर,खुशाल बोंडे व देवराव भोंगळे यानीही समयोचित विचार व्यक्त केले.यावेळी हंसराज अहीर व मान्यवराच्या शुभहस्ते ज्येष्ठ नागरिक, समाजसेवी व शिक्षकवृदांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छदेवून सन्मानित केले व शालेय विद्यार्थ्यांना नोटबुकसचे वितरण करण्यात आले याकार्यक्रमास महिला, पुरूष व आबाल वृध्दांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये