Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

माता विहार चॅरिटेबल नर्सिंग होम व महाराष्ट्र शासनाच्या वतीने आरोग्य शिबिर

चनाखा वासियांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

जि. प. उच्च प्राथ. शाळा, चनाखा येथे राज्य स्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष(गृह/विधी व न्याय)यांचे कार्यालय मंत्रालय महाराष्ट्र राज्य व माता विहार चॅरिटेबल नर्सिंग होम शेनगाव ता.जिवती यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१२ सप्टेंबर २०२४ रोजी विनामूल्य सामुदायिक आरोग्य शिबीर घेण्यात आले.

सदर शिबीरामध्ये रक्तदाब,  ई.सी.जी, मधुमेह, युरीन तसेच इतर आजारांच्या तपासण्या करण्यात आल्या. सदर शिबिरात 85 गावकरी तसेच शाळेतील ६८ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांना गरजेनुसार निःशुल्क औषधी देण्यात आली.

आरोग्य शिबिराला उपस्थित सर्व मान्यवरांचे शाळेचे मुख्याध्यापक वाटेकर ह्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. वैद्यकीय तपासणी करीता डॉ. अनिता अरके, वैद्यकीय अधिकारी, डॉ. श्रुती नगराळे, सिस्टर अन्सली, सिस्टर लुसी व माता विहार चॅरिटेबल नर्सिंग होम शेणगाव च्या वैद्यकीय सहाय्यक तसेच शाळेच्या सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन संदीप कोंडेकर यांनी केले तर शाळेचे शिक्षक लांजेकर ह्यांनी वैद्यकीय चमु  तसेच माता विहार चॅरिटेबल नर्सिंग होम शेनगाव ह्यांचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये