Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

चंद्रपूर जिल्हा शासनमान्य कंप्युटर टंकलेखन व लघुलेखन संस्थांची संघटना गठीत – जिल्हाध्यक्ष पदावर नितीन इंगोले अविरोध

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

महाराष्ट्र राज्य कंप्युटर टंकलेखन व लघुलेखन संस्थांची संघटना, मुंबई ह्या संस्थेची चंद्रपूर जिल्ह्यात शाखा स्थापन करण्यात आली असुन चंद्रपूर जिल्हा शासनमान्य कंप्युटर टंकलेखन व लघुलेखन संस्थांची संघटनेची निवडणूक नुकतीच पार पडली.

ह्या निवडणुकीत महालक्ष्मी कॉम्पुटर टायपिंग इन्स्टिटयूट चे प्राचार्य नितीन इंगोले यांची चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली. तर  सचिव पदावर अल्केश देशमुख, कोषाध्यक्ष बालाजी जिलल्ला, उपाध्यक्ष पदावर विजयालक्ष्मी कोटकर, कार्याध्यक्ष सुनील सोमनाथे, सहसचिव सोमेश्वर कातारकार, परीक्षा सचिव चेतन ईटनकर, संगणक तज्ज्ञ म्हणून दिनेश शेंडे, अनिल बुगदलवार, अनिल जवादे तर सदस्य म्हणून कलाम शेख, रामचंद्र सेलोकर, जयंत दातारकार, विद्या गोरघाटे, नलिनी गोडे, तुळशीदास तुम्मे, अजय पडोळे यांची निवड करण्यात आली.

चंद्रपूर जिल्हा संघटना हि महाराष्ट्र राज्य कॉम्पुटर टंकलेखन व लघुलेखन संस्थांची संघटना, मुंबई शी संलग्न असून महाराष्ट्रात एकूण ४५०० शासनमान्य संस्था असून चंद्रपुर जिल्ह्यात एकूण ७० शासनमान्य संस्था कार्यरत आहे.

महाराष्ट्र राज्य कार्यकारणीचे सह-सचिव संजय लेडांगे तसेच उपस्थित सर्व संस्था चालकांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. अध्यक्षीय भाषणात चंद्रपूर जिल्ह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन इंगोले यांनी जिल्ह्यातील सर्व संस्थचालकांचे प्रश्न मार्गी लावणार असून संघटनेत नवचैतन्य निर्माण करण्याचा मानस बोलून दाखविला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये