Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लॉयड्स मेटल्स कंपनीत तीस टक्के महिलांना काम द्या: यास्मिन सय्यद

महिला क्रांती संघटनेने निवेदनाद्वारे मागणी केली 

चांदा ब्लास्ट

  घुग्घुस (चंद्रपूर) : घुग्घुस हे औद्योगिक शहर असून नगरमध्ये लॉयड्स मेटल्स कंपनीतर्फे नवीन विस्तारीकरण प्रकल्प उभारण्यात येत असून त्यातून अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, महिलांनी यामध्ये सहभागी व्हावे, अशी प्रमुख मागणी महिला क्रांती संघटनेने केली आहे. शहरातील महिलांची संख्या पुरुषांच्या बरोबरीने असून आज महिला सुशिक्षित आणि तांत्रिक कामात कुशल आहेत. उद्योगधंद्यांमुळे पसरणाऱ्या प्रदूषणामुळे महिलांना अनेक गंभीर आजार होत आहेत. मात्र या उद्योगात मोजक्याच महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यास्मिन सय्यद व सुजाता सोनटक्के यांच्या नेतृत्वाखालील महिला क्रांती ग्रुपने लॉयड्स कंपनीत लोकसंख्येच्या प्रमाणानुसार तीस टक्के महिलांना नोकरी देण्याची मागणी केली आहे.

 यासोबतच लॉयड्स कंपनीच्या मुख्य गेटवर गेल्या अनेक वर्षांपासून भाजीचे दुकान चालवणाऱ्या लता नागेश नलभोग या महिलेचे दुकान अतिक्रमणाच्या नावाखाली हटवण्यात आले. सदर महिलेला आर्थिक मदत करण्यात यावी. 10 लाख रुपयांचे मोफत प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करून द्यावे.

 शहरातील गरीब व गरजू मुलींना शालेय साहित्य, सायकल व मोफत संगणक (टॅबलेट) वाटप करण्यात यावे तसेच शहरात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महिलांनी कंपनीविरोधात केवळ सात दिनात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  यावेळी शिष्टमंडळात सरस्वती पाटील, शिल्पा गोहील, मंगला बुरांडे, नीलिमा वाघमारे, चंदा ताई दुर्गे, अनुसया नन्नावरे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये