ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
भोयगाव जवळील वर्धा नदीवर नवीन पुल तयार करा
इबादुल सिद्धिकी यांची मागणी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
गडचांदूर चंद्रपूर महामार्गावरील भोयगावं जवळील वर्धा नदीवर सध्या असलेल्या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पुलावर वारंवार पाणी येत असल्याने वाहतूक प्रभावित होत असते, या वर्षी तर चार वेळा रस्ता बंद होता म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकरणी लक्ष वेधून नवीन उंच पुल तयार करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते इबादुल सिद्दिकी यांनी उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन केली आहे.
या पुलावरून दिवस रात्र सिमेंट व कोळसा वाहतूक सूरू असते, पावसाळ्यात माञ पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक प्रभावित होऊन ट्रक च्या लांबच लांब रांगा लागतात, तेव्हा तात्काळ या ठिकाणी नवीन उंच पुल तयार करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.