“चोर मुरुम रेती माफियां” वर त्वरित गुन्हा दाखल करुन अटक करावी..!
रिपाइं (ए) ची मागणी!
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
राज्य सरकार व स्थानिक आमदार यांना निवेदनाच्या खुल्या पत्राव्दारे सांगू इच्छितो की,नितेश कराळे मास्तर यांनी मुरुमाची रॉयल्टी पावती दाखवा असे प्रश्न करणे व पावती मागणे हा गुन्हा आहे का ? पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या खास सभेसाठी चोरीचा मुरुम स्थानिक आमदार लोकप्रतनिधीनी यांच्या इशार्याने जिल्हा धिककारी प्रशासनाने वापरणे हे लज्जास्पद आहे.त्यामळे स्थानिक आमदार यांनी खुलासा करावा,असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे विदर्भ प्रदेश तथा वर्धा जिल्हा अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे.
मुरुम माफियांच्या,मुरमाच्या चोऱ्या स्थानिक जिल्हा महसुल विभागाचे अधिकारी तसेच जनतेने निवडूण दिलेले स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी हे खऱ्या अर्थाने पकडू शकले नाहीत,ते कराळे मास्तरांनी जनते समोर उघड करुन दाखविले,मुरुम माफियांकडून मुरमाच्या चोऱ्या कशा होतात ते पण त्यांनी राज्य सरकारला निर्भिडपने करुन दाखविले,त्याच नितेश कराळे मास्तरांवर हेच “मुरुम माफिया चोर” भ्याड हल्ला करतात.हि महायुती सरकारसाठी शरमेची गोष्ट आहे.
म्हणूनच कराळे मास्तर यांनी केलेल्या आरोपा नुसार अशा मुरुम माफिया चोरट्यांना पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या सभेच्या स्थळाच्या सौंदर्यासाठी आशिर्वाद नेमका कुणाचा आहे ? याबाबत भाजपचे स्थानिक वर्धा चे आमदार यांनी खुलासा करावा.
मोदींच्या सभेसाठी महसूल अधिनियम परवानगी शिवाय चोरीच्या मार्गाने मुरुम नेणारे मुख्य सूत्रधार कोण आहेत…. ? ते जनते समोर ताबडतोब उघड करावे आणि उच्चस्तरीय कार्यवाही करुन मुरुम चोर माफियांवर गुन्हा दाखल करुन अटक करावी.अन्यथा तीव्र आंदोलन करु.असा गर्भित इशारा रिपाइं (ए) नेते महेंद्र मुनेश्वर यांनी दिला आहे.
नितेश कराळे मास्तर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) तर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे असेही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून कळविले आहे.
महेंद्र मुनेश्वर,वर्धा
अध्यक्ष : विदर्भ प्रदेश – रिपाइं (ए)